भाळवणीच्या कुस्ती आखाड्याला राजेंची हजेरी पारनेर | नगर सह्याद्री छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज यांच्या काळात कुस्तीला राजश्रय मिळाल्यान...
भाळवणीच्या कुस्ती आखाड्याला राजेंची हजेरी
पारनेर | नगर सह्याद्रीछत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज यांच्या काळात कुस्तीला राजश्रय मिळाल्याने कुस्तीचा मोठा नावलौकिक झाला. कुस्तीचे नाव सातासमुद्रापार पोहोचले. तर दुसरीकडे कुस्तीमुळे कोल्हापूरच्या लाल आखाड्याचे नाव जगात पोहोचले असल्याचे मत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशज छत्रपती संभाजी राजे यांनी भाळवणी येथील कुस्ती आखाड्यात व्यक्त केले आहे.
महाशिवरात्री निमित्ताने भाळवणी येथील नागेश्वरी ग्रामदेवतेच्या यात्रोत्सवा निमित्ताने कुस्ती आखाड्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे १३ वे वंशज छत्रपती संभाजी राजे यांच्या हस्ते कुस्ती लावण्यात आली.
यावेळी संभाजी राजे म्हणाले की शिवाजी महाराजांच्या व शाहू महाराजांच्या काळात कुस्तीला राजाश्रय मिळाला कोल्हापूरला कुस्ती पंढरी मानले जात आहे. त्यामुळे कुस्तीचा मी भक्त आहे.
लाल आखाडा जगातला सर्वात मोठा आखाडा आहे. अंगाला माती लागली आहे. शिस्त असली पाहिजे तर कुस्ती मजा आहे. लोकांच्या भावना कुस्ती साठी महत्वाच्या आहेत. शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने हा आखाडा आयोजित करून अनोखी शिवजयंती साजरी केली असल्याचे छत्रपती संभाजी राजे म्हणाले. यावेळी सरपंच लीलाबाई रोहकले, तालुकाध्यक्ष संभाजी रोहोकले तालुकाध्यक्ष बंडू रोहकले, तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे, बबलुशेठ रोहकले, प्रा. गोविंद भुजबळ, उपसरपंच अप्पादादा रोहकले, चेअरमन बाबुशेठ रोहकले, अरूण रोहकले, नामदेव रोहकले, शैलेश रोहकले, तुषार रोहकले, सुरज भुजबळ, रमेश रोहकले, पिंटुशेठ गोडसे, रमेश रोहकले, मयुर रोहकले, दिपक रोहकले, पोपट रोकडे, अक्षय रोहकले, संतोष रोहकले, संदिप ठुबे, संदिप रोहकले, संदिप कपाळे, बबन रोहकले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महिला कुस्तीपटू लावण्ण्या
गोडसेंची प्रेक्षणीय कुस्ती..
महाशिवरात्री निमित्ताने भाळवणी येथील कुस्ती आखाड्यात महिला कुस्तीपटू लावण्या पिंटू शेठ गोडसे हिने पुरुष पैलवान सोबत कुस्ती केली. या प्रेक्षणीय कुस्ती दरम्यान या महिला कुस्तीपटू लावण्याने एका झटयात या पुरुष पैलवानाला डाव टाकत कुस्ती चितपट करून कुस्ती शौकिनांच्या डोळ्याचे पारणे फेडले लावण्य गोडसे ही कोल्हापुर येथे सराव करत असून कुस्तीमध्ये करिअर करण्याचा निर्णय तिने आपले पालक पैलवान पिंटुशेठ गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली घेतला आहे.
COMMENTS