पारनेर | नगर सह्याद्री विद्यार्थ्यांनी तणावमुक्त राहुन अभ्यासावर लक्ष केंद्रीत करावे. इ.१०वी व १२वी ची परिक्षा ही अंतिम नसून अशा अनेक परिक्ष...
पारनेर | नगर सह्याद्री
विद्यार्थ्यांनी तणावमुक्त राहुन अभ्यासावर लक्ष केंद्रीत करावे. इ.१०वी व १२वी ची परिक्षा ही अंतिम नसून अशा अनेक परिक्षांना तुम्हाला सामोरे जायचे आहे. ध्येय निश्चित करुन केलेल्या कृतीतून तुम्ही यशस्वी होवू शकता, असे प्रतिपादन अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त पंकज जावळे यांनी केले.
नवीपेठ येथील प्रगत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील इ.१० वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतांना डॉ.पंकज जावळे बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे सहसचिव सुनिल रुणवाल होते, प्रमुख पाहुणे म्हणून जि.प.चे कार्य.अभियंता पांडूरंग गायसमुद्रे, संस्थेचे अध्यक्ष दि.ना.जोशी,सचिव अनिरुद्ध देवचक्के, प्राचार्य सुनिल पंडित, मुख्याध्यापिका सौ.प्रतिमा धरक, सौ.अनुराधा जोशी आदि उपस्थित होते.
याप्रसंगी सचिव देवचक्के यांनी विद्यार्थ्यांना परिक्षेचे महत्व आणि परिक्षेला सामोरे जातांना घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन केले.प्रास्तविकात प्राचार्य सुनिल पंडित यांनी विद्यालयाच्यावतीने विद्यार्थ्यांची परिपूर्ण तयारी करुन घेतली असल्याने हे विद्यार्थी चांगल्या गुणांनी नक्कीच यशस्वी होतील, असा विश्वास व्यक्त केला.यावेळी पांडूरंग गायसमुद्रे, अध्यक्ष दि.ना.जोशी, सहसचिव रुणवाल, सौ.प्रतिमा धरम, सौ.हर्षाली देशमुख, विजय गरड आदिंनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप रोकडे यांनी केले तर आभार सिमाताई शिंदे यांनी मानले.
COMMENTS