सुपा | नगर सह्याद्री माणसाला जीवदान देणारे डॉटर हे एक प्रकारचे देवच असतात. नुकत्याच एका घटनेने भावी डॉटरांनी परदेशात माणुसकीचं दर्शन घडवून प...
माणसाला जीवदान देणारे डॉटर हे एक प्रकारचे देवच असतात. नुकत्याच एका घटनेने भावी डॉटरांनी परदेशात माणुसकीचं दर्शन घडवून पुन्हा एकदा हे सिद्ध केलंय. बीड जिल्ह्यातील पांडुरंग काळबा भुतपल्ले या शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. रशियात वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या रुपेश या त्यांच्या मुलाला वडिलांच्या दुर्दैवी मृत्यूची बातमी समजली. पण वडिलांच्या अंत्यविधीसाठी जायचं कसं हा मोठा प्रश्न रुपेश पुढं उभा राहिला. कारण रुपेशच्या खिशात अवघे एक हजार रुपये होते. रुपेशच्या वडिलांच्या आत्महत्येची बातमी त्याच्या सोबत रशियात वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या त्याच्या भारतीय मित्रांना समजली. रुपेशची वडिलांच्या अंत्यविधीला जाण्याची अडचण लक्षात घेऊन पारनेर तालुयातील पळवे खुर्द गावातील सुपुत्र प्रथमेश संतोष बारगळ याने पुढाकार घेतला.
प्रथमेशने आपल्या सगळ्या मित्रांना रुपेशची परिस्थिती सांगितली आणि त्याला भारतात वडिलांच्या अंत्यविधीला जाण्यासाठी मदतीचे आवाहन केले. प्रथमेशच्या आवाहानाला प्रतिसाद देत सगळ्या मित्रांनी तात्काळ पैशाची जमवाजमव केली. आपापल्या कुवतीप्रमाणे पाचशे, एक हजार, दोन हजार रुपये देऊन क्षणात सव्वा लाखाची रक्कम या मित्रांनी उभी केली. या भावी डॉटरांनी तात्काळ विमानाचे तिकीट काढून रुपेशला वडिलांच्या अंत्यविधीसाठी बीडला रवाना केले.
रशिया सारख्या अनोळखी देशात अडचणीत सापडलेल्या रुपेशला क्षणात मदत करुन भावी डॉटरांनी माणुसकी दाखविल्यामुळेच रुपेशला वडिलांच्या अंत्यविधीला वेळेवर पोहचता आले. भावी डॉटरांनी परदेशात माणुसकीचं दर्शन दाखवून एक आदर्श निर्माण केला आहे. ही प्रत्येक भारतीयांसाठी खूपच कौतुकास्पद आणि अभिमानास्पद अशी गोष्ट आहे.
COMMENTS