अहमदनगर | नगर सह्याद्री छत्रपती शिवाजी महाराज हे एक व्यक्ती नसून तो एक चिरंतर विचार आहे. या विचाराला पुढे घेऊन जाण्याचे काम राजमाता जिजाऊ प्...
छत्रपती शिवाजी महाराज हे एक व्यक्ती नसून तो एक चिरंतर विचार आहे. या विचाराला पुढे घेऊन जाण्याचे काम राजमाता जिजाऊ प्रतिष्ठाणच्या वतीने करण्यात येत आहे.छत्रपती शिवाजी महाराजांचा सामाजिक कामाचा वारसा प्रत्येकाने जोपासुन गरजूंना मदत करावी,असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानच्या वतीने दामोदर हॉटेल याठिकाणी शिवजन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.कोरोना काळामध्ये पतीचा दुर्दैवी मृत्यू झालेल्या गरजूवंत महिलांना सक्षम बनवण्यासाठी व त्यांना थोडासा हातभार लावण्यासाठी जिजाऊ प्रतिष्ठानच्या वतीने शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रतिष्ठानच्या वतीने राजेंद्र ससे यांनी सर्वांचे स्वागत केले. दत्ता साठे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सुत्रसंचलन व आभार प्रा.डॉ.विजय म्हस्के यांनी केले.
यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हा अध्यक्ष प्रा.माणिक विधाते, नगरसेवक अविनाश घुले, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष इंजि. सुरेश इथापे, प्रतिष्ठानचे राजेंद्र ससे, मराठा पतसंस्थेचे व्हॉइस चेअरमन सतीश इंगळे, उदय अनभुले, चित्रकूट इंटरनॅशनल स्कूलचे संचालक संजय चव्हाण, दत्ता साठे, पप्पूशेठ गीते, अतुल लहारे, अजय दिघे, सुनील जरे, श्रीपाद दगडे, इंजि. हेमत मुळे, निलेश म्हसे, दिगंबर भोसले, वैभव शिंदे, सचिन जगताप, किशोर मरकड, बापू राजेभोसले, प्रशांत गंधे, संदीप जगताप, विजय रोकडे, सुदाम मडके, मिलिंद जपे, लक्ष्मण सोनावळे, सुभाष सूर्यवंशी , सोमनाथ शेळके, सोमनाथ कराळे, हरकू मगर आदींसह मोठया प्रमाणावर मराठा समाजातील महिला, मुले या कार्यक्रमास उपस्थित होते. यावेळी दामोदर बिर्याणी हाऊ चे संचालक राजेंद्र ससे यांनी शिव फराळचे आयोजन केले होते.
COMMENTS