कासारे गावात ग्रामसंघ महिला बचत गट मेळावा पारनेर | नगर सह्याद्री बचत करण्याची क्षमता पुरूषांपेक्षा महिलांमध्ये जास्त असुन ग्रामीण भागात बचत...
कासारे गावात ग्रामसंघ महिला बचत गट मेळावा
पारनेर | नगर सह्याद्रीबचत करण्याची क्षमता पुरूषांपेक्षा महिलांमध्ये जास्त असुन ग्रामीण भागात बचत गटांच्या माध्यमातून आर्थिक क्रांती झाली असल्याचे मत सरपंच शिवाजी निमसे यांनी व्यक्त केले आहे. तर दुसरीकडे या बचत गटांच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण झाले असून या बचत गटांमुळे छोट्या मोठ्या व्यवसायांना हातभार लागला असल्याचे सरपंच शिवाजी निमसे यांनी सांगितले आहे.
नेवासा तालुयातील बचत गटातील ६५ ते ७० महिलांनी कासारे या आदर्श ग्रामसंसद गावास भेट दिली. कासारे येथील बचत गटातील महिलांसोबत संवाद साधून विचारांची देवाण-घेवाण करण्यात आली. तसेच महिला सक्षीमीकरण. लघु उद्योग उपाजीविका, पाणलोटची गरज व भविष्यात कासारे गावासाठी करावयाची कामे या बाबतीत कासारे गावाचे सरपंच शिवाजी निमसे यांनी मनोगत व्यक्त करून मार्गदर्शन केले. त्यावेळेस गावातील सामाजिक कार्यकर्ते वसंतराव दातीर यांनी गावाची पार्शभूमी सांगितली. यावेळेस उपसरपंच शैला घनवट, गोकुळ निमसे, देवराम घनवट, सखाराम नरड, तुकाराम साळवे, ज्योति घनवट, जोसना चौरे, पुष्पा डेरे आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. प्रसंगी संस्थेचे बिंदू सिस्टर व त्यांचे सहकारी यांनी सदर कार्यक्रमाचे आयोजन, नियोजन केले.
COMMENTS