ढवळपुरी येथे १० व १२ वी विद्यार्थ्यांना बोर्ड परिक्षेसाठी शुभेच्छा समारंभ पारनेर | नगर सह्याद्री ग्रामीण व दुर्गम भागातील वंचित, गरजू विद्...
ढवळपुरी येथे १० व १२ वी विद्यार्थ्यांना बोर्ड परिक्षेसाठी शुभेच्छा समारंभ
पारनेर | नगर सह्याद्रीग्रामीण व दुर्गम भागातील वंचित, गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाने खेडोपाडी शाळा सुरू करुन ज्ञानाची गंगा पोहचवण्याचे काम केले, असे मत पारनेर पंचायत समितीचे माजी सभापती राहुल झावरे यांनी व्यक्त केले.
ढवळपुरी अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री दुर्गादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण व दहावी, बारावी विद्यार्थ्यांना शुभेच्छा समारंभ व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे सिनेट सदस्य डॉ. बाळासाहेब सागडे होते. यावेळी पंचायत समिती सदस्या ताराबाई चौधरी, सरपंच नंदाताई गावडे, माजी सरपंच डॉ. राजेश भनगडे, मुख्याध्यापक सुनील वाव्हळ, नारायणराव चितळकर, अहमद पटेल, बाजीराव थोरात, पोपटराव चौधरी, ग्रामपंचायत सदस्य रमेश केदारी, संदीप थोरात, मच्छिंद्र व्यवहारे, बबन कर्हे, संभाजी ढेकळे, सोपान सांगळे, अर्जून भुजबळ, मंजाबापू चौधरी, भास्कर बिडे उपस्थित होते. बक्षिस वितरण माजी सभापती राहुल नंदकुमार झावरे यांच्या हस्ते झाले.
विद्यापीठ सिनेट सदस्य डॉ. बाळासाहेब सागडे यांनी यावेळी न्यू आर्टस कामर्स सायन्स कॉलेज अ.नगर येथे शिक्षणाच्या उपलब्ध सुविधा बाबत माहिती विद्यार्थ्यांना दिली. यावेळी ढवळपुरीचे माजी सरपंच डॉ. राजेश भनगडे, पंचायत समिती सदस्या ताराबाई चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी वामन थोरात, आप्पासाहेब थोरात, नाना पांडे, मारुती भालेराव, प्रेमराज राठोड, आण्णा आघाव, नामदेव सांगळे, नामदेव गावडे, मनोहर पारखे, नामदेव देवकाते, नामदेव गावडे, रंगनाथ पारखे, देवराम क्षवाव्हळ, अकबर पठाण, दत्तात्रय थोरात, भाऊसाहेब भुसारी उपस्थित होते. प्रास्ताविक सुनिल वाव्हळ यांनी सूत्रसंचलन अजित सांगळे यांनी केले.आभार जनार्दन बनकर यांनी मानले.
COMMENTS