पारनेर | नगर सह्याद्री तालुयातील दैठणे गुंजाळ येथील मुख्याध्यापक संदीप गुंजाळ यांना दापोली रत्नागिरी जिल्ह्यातील शिक्षण विभागातर्फे राष्ट्र...
तालुयातील दैठणे गुंजाळ येथील मुख्याध्यापक संदीप गुंजाळ यांना दापोली रत्नागिरी जिल्ह्यातील शिक्षण विभागातर्फे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरेंच्या हस्ते ’आदर्श शिक्षक’ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
शिक्षण विभागात विद्यादानाचे काम करणार्या शिक्षकांचा सन्मान व्हावा, या उद्देशाने दापोली रत्नागिरी जिल्ह्यातील शिक्षण विभागातर्फे ’आदर्श शिक्षक’ पुरस्कार दिला जातो. २०२२-२०२३ या वर्षाच्या आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी दापोली पंचायत समिती शालेय शिक्षण आदर्श गुणवंत शिक्षक म्हणून डौली तालुका दापोली. मुळचे दैठणे गुंजाळचे. संदीप गुंजाळ (मुख्याध्यापक) यांची निवड करण्यात आली होती. या पुरस्कारांच वितरण सोहळा १९ फेब्रवारी रोजी दापोली या ठिकाणी करण्यात आला.
शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणार्या शिक्षकांना त्यांच्या अंगीकृत कामात प्रोत्साहन देण्यासाठी तसेच त्यांच्या गुणांचा यथोचित सन्मान करण्याच्या उद्देशाने दापोली रत्नागिरी शिक्षकांना जाहीर करण्यात येतो.
रायगड-रत्नागिरीचे लोकसभा खासदार सुनील तटकरे यांच्या शुभहस्ते हा आदर्श, गुणवंत शिक्षक पुरस्कार संदीप गुंजाळ यांना देण्यात आला. यावेळी गटविकासाधिकारी दिघे, गटशिक्षणाधिकारी बळवंतराव सर्व अधिकारी, पदाधिकारी, सर्व केंद्रप्रमुख, डौली शाळेतील सर्व विद्यार्थी पालक, गावकरी, समस्त दापोलीकर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS