अहमदनगर | नगर सह्याद्री शहर पाणीपुरवठा योजनेवरील विळद जलशुद्धीकरण केंद्रातील ट्रान्सफार्मरमध्ये सोमवारी बिघाड झाल्यामुळे शहराचा पाणी पुरवठा...
अहमदनगर | नगर सह्याद्री
शहर पाणीपुरवठा योजनेवरील विळद जलशुद्धीकरण केंद्रातील ट्रान्सफार्मरमध्ये सोमवारी बिघाड झाल्यामुळे शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे पाणी उपसा पूर्णपणे बंद झाला आहे. महापालिकेमार्फत ट्रान्सफार्मर दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. या काळात उपसा बंद राहणार असल्याने वितरण टाया वेळेत भरणे शय नाही. त्यामुळे पाणीपुरवठा होऊ शकला नसल्याचे मनपाने स्पष्ट केले आहे.या प्रकारामुळे शहराच्या पाणी पुरवठ्यात बदल करण्यात आला असून, मंगलगेट, रामचंद्र खुंट, झेंडीगेट, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, दाळमंडई, काळू बागवान गल्ली, धरती चौक, माळीवाडा, कोठी भागासह गुलमोहर रोड, प्रोफेसर कॉलनी परिसर, सिव्हील हाडको, प्रेमदान हाडको, म्युनिसीपल हाडको इत्यादी भागात मंगळवार ऐवजी बुधवारी पाणीपुरवठा करण्यात आला. बुधवारी रोटेशननुसार पाणी वाटप असलेल्या शहराच्या मध्यवर्ती भागातील तोफखाना, सिद्धार्थनगर, लालटाकी, दिल्लीगेट, नालेगाव, चितळे रोड, माणिक चौक, आनंदी बाजार, नवी पेठ, कापड बाजार आदी भागास पाणीपुरवठा गुरूवारी उशिराने व कमी दाबाने होणार आहे. तसेच मुकुंदनगर, लक्ष्मीनगर, अर्बन बँक कॉलनी, निर्मलनगर, सूर्यनगर, शिवाजीनगर इत्यादी उपनगरास एक दिवस उशिराने पाणीपुरवठा होणार असल्याचे महापालिकेने कळविले आहे.
COMMENTS