निघोजमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी निघोज | नगर सह्याद्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार युवा नेतृत्वाला प्रेरणादायी असून आजच्या युवकां...
निघोजमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी
निघोज | नगर सह्याद्रीछत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार युवा नेतृत्वाला प्रेरणादायी असून आजच्या युवकांनी महाराजांचे विचार व आचरणांचे पाईक होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पारनेरचे नगराध्यक्ष विजय औटी यांनी व्यक्त केले आहे.
निघोज येथील पाटील उद्योग समूहाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. यावेळी पारनेरचे नगराध्यक्ष विजय औटी तसेच सुमनताई विनायक वराळ यांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करीत दिपप्रज्वलन करण्यात आले. तसेच संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ यांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालण्यात आला. तसेच अल्पसंख्याक समाजाचे नेते व पारनेर तालुका मुस्लिम समाज संघटनेचे मुख्य पदाधिकारी अस्लमभाई इनामदार यांच्या हस्ते महाराजांची महाआरती करण्यात आली. सरपंच चित्राताई वराळ पाटील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ, मंळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे विश्वस्त भास्करराव वराळ पाटील, पाटील उद्योग समूहाचे अध्यक्ष आप्पासाहेब वराळ पाटील, सामाजिक कार्यकर्ते गजाभाऊ ठुबे, राष्ट्रवादी काँग्रेसचे मिडिया सेलचे प्रदेशाध्यक्ष जितेश सरडे, पारनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष सोमनाथ वरखडे, हिंदवी शिक्षण संस्थेचे संस्थापक सचिव शिवाजीराव वराळ, प्रसिद्ध ठेकेदार नीलेश घोडे, पैलवान सुभाष वराळ, रामदास महाराज वराळ, आपला गणपती गणेश मित्र मंडळाचे अध्यक्ष रवि रणसिंग, अल्पसंख्याक समाजाचे नेते अस्लमभाई इनामदार, भाजपचे जिल्हा सांस्कृतिक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष विलासराव हारदे, भाजपचे ओबीसी विभागाचे तालुका अध्यक्ष मनोहर राउत, किशोर हारदे, मोबाईल शॉपीचे मालक प्रविण काळघुगे, राहूल वराळ,मेजर सुनिल वराळ, प्रविण वराळ, रामाशेठ वराळ, शंकर वराळ, सुनिल घुले, नाना राऊत, चेतन रसाळ, सुयश वराळ, लाहनूबाई वराळ, सुमनबाई वराळ, चित्रा हारदे, अश्विनी वराळ, विशाखा वराळ, मोनिका पिंपरकर, सुंदर हारदे, आशा वराळ, स्वप्नाली वराळ, रेषमा वराळ आदी ग्रामस्थ तसेच महिला भगीनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. औटी यावेळी म्हणाले गेली अनेक वर्षांपासून आप्पासाहेब वराळ पाटील व त्यांचे सहकारी पाटील उद्योग समूहाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करुण हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करतात. छत्रपती शिवाजी महाराज यांचे आचार व विचार सर्वांनाच प्रेरक असून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याने देशाचा नावलौकिक जगात झाला असल्याचे प्रतिपादन त्यांनी व्यक्त केले आहे. विलासराव हारदे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. शेवटी शंकर वराळ यांनी आभार मानले.
COMMENTS