अहमदनगर | नगर सह्याद्री गुगलवरून झी-५ अॅपचा घेतलेल्या हेल्पलाईन नंबरवर संपर्क केल्याने एका नोकरदाराला महागात पडले. समोरील व्यक्तीने सांगित...
गुगलवरून झी-५ अॅपचा घेतलेल्या हेल्पलाईन नंबरवर संपर्क केल्याने एका नोकरदाराला महागात पडले. समोरील व्यक्तीने सांगितल्याप्रमाणे प्रतिसाद दिला आणि बँक खात्यातून एक लाख ८७ हजार रूपये काढून फसवणूक करण्यात आली. जयंत गोविंद देशमुख (वय ५५ रा. डॉटर कॉलनी, बुरूडगाव रोड) असे फसवणूक झालेल्यांचे नाव आहे. त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी अहमदनगर डिस्ट्रीट सेंट्रल को. ऑप. बँकेच्या मुख्य कार्यालयात अहमदनगर येथे नोकरीस आहेत. त्यांचे एसबीआय शाखा बुरूडगाव येथे सेव्हिंग खाते आहे. २८ जानेवारीला त्यांनी मोबाईलमधून झी-५ अॅपचे ६९९ रूपयांचे रिचार्ज केले; परंतु झी-५ अॅप अॅटीव झाले नव्हते. म्हणून १४ फेब्रुवारीला सायंकाळी फिर्यादीने गुगलवरून झी-५ अॅपचा हेल्पलाईन नंबर शोधून संपर्क केला. समोरील व्यक्तीने त्यांना तुमचे ६९९ रूपयेचे रिचार्ज दिसत असल्याचे सांगितले व तुमचे अॅप अॅटीव नसल्यामुळे तुम्हाला एक रूपया फोन पे चा चार्ज भरावा लागेल, असे सांगितल्याने फिर्यादी यांनी त्याला फोन पेद्वारे एक रूपया पाठविला.
तसेच झी-५ अॅप करता एक दुसरे अॅप डाऊनलोड करायला सांगून त्यासाठी एक लिंक पाठविली. त्या लिंकव्दारे फिर्यादी यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये त्या व्यक्तीच्या सांगण्याप्रमाणे एक अॅप डाऊनलोड केले. त्या व्यक्तीने फोनव्दारे ३६ तासानंतर तुमचे झी-५ अॅप अॅटीव होईल, असे सांगितले. १८ फेब्रुवारीला फिर्यादी यांच्या बँक खात्यावरून एक लाख ८७ हजार एक रूपये काढून घेतल्याचे त्यांना समजले. परस्पर बँक खात्यातून पैसे काढून घेत फसवणूक केल्याचे लक्षात येताच देशमुख यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरूद्ध गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस अंमलदार शरद गायकवाड करीत आहेत.
COMMENTS