मुंबई । नगर सह्याद्री - एमपीएससीच्या विदयार्थ्यांनी काल सोमवारपासून पुण्यातील बालगंधर्व चौकात विद्यार्थ्यांचे आंदोलन केले आहे. मागण्या पूर्...
मुंबई । नगर सह्याद्री -
एमपीएससीच्या विदयार्थ्यांनी काल सोमवारपासून पुण्यातील बालगंधर्व चौकात विद्यार्थ्यांचे आंदोलन केले आहे. मागण्या पूर्ण केल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही या निर्णयावर विद्यार्थी ठाम आहे. अशात या विद्यार्थ्यांबरोबर काँग्रेसचे काही कार्यकर्ते देखील आमरण उपोषण करत आहे. यावर सरकार काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सलग दुसऱ्या दिवशी देखील विद्यार्थ्यांचे सुरू असलेले आंदोलन पाहता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर आपले मत व्यक्त केले आहे. ' मी स्वत: एमपीएससी प्रमुखांशी बोललो आणि समजावून सांगितले आहे. MPSC चा जो अभ्यासक्रम आहे ऑब्जेक्टीव आणि डिस्क्रीप्टीव हे दोन्ही बदलण्यास आमची हरकत नाही. मात्र विद्यार्थ्यांचे म्हणणे आम्हाला मान्य आहे. जो बदल करायचा आहे तो साल २०२५ पासून करण्यात यावा. आम्ही यासाठी सर्व विद्यार्थ्यांच्या पाठीशी आहोत. याआधीही आम्ही विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी काम केली आणि आता देखील आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
साल 2025 पासून नवा अभ्यासक्रम लागू करावा.
पॅटर्न लागू करण्यासाठी घाई करु नये.
अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांना किमान 5 ते 6 महिन्यांचा वेळ मिळावा.
नवा अभ्यासक्रम यूपीएससीच्या अभ्यासक्रमवार आधारित असल्याने पुस्तके उपलब्ध नाहीत. ती उपलब्ध करून द्यावीत.
COMMENTS