नवी दिल्ली । नगर सह्याद्री - टर्की आणि सिरीयामध्ये झालेल्या भूकंपात हजारो लोकांचे प्राण गेले आहे. अद्यापही बचावकार्य सुरू आहे. अशातच राष्ट...
नवी दिल्ली । नगर सह्याद्री -
टर्की आणि सिरीयामध्ये झालेल्या भूकंपात हजारो लोकांचे प्राण गेले आहे. अद्यापही बचावकार्य सुरू आहे. अशातच राष्ट्रीय भूभौतिकीय संशोधन संस्थेने (एनजीआरआय) उत्तराखंडमध्ये कधीही भूकंप होण्याची शयता व्यक्त केली आहे. संस्थेतील मुख्य शास्त्रज्ञ डॉ. एन. पूर्णचंद्र राव म्हणाले आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या खाली विविध स्तर असतात, ज्यांची सतत हालचाल होत असते. भारतातील पृष्ठभागाखालील स्तर प्रतिवर्षी ५ सेटींमीटरने सरकत आहे. याने दबाव निर्माण होऊन मोठा भूकंप होण्याची शयता आहे. हिमाचल, उत्तराखंडसह नेपाळच्या पश्चिम भागात कधीही भूकंप होऊ शकतो. त्यापार्श्वभूमीवर आम्ही उत्तराखंडमध्ये १८ भूकंप केंद्रे स्थापन केली आहेत. उत्तराखंडमधील हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या जोशीमठ येथील घरे, दुकान, हॉटेलांना भेगा पडल्या आहेत. त्यामुळे हजारो लोकांना आपली घरे सोडून विस्थापित व्हावे लागले. विशेष म्हणजे १९७६ पासूनच या भागात अशाप्रकारच्या घटनाक्रमांचे इशारे देण्यात आले होते.
COMMENTS