मुंबई । नगर सह्याद्री - सुनावणीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या शिवसेना नाव, धनुष्यबाण शिंदे गटाला देण्याच्या निर्णयानंतर राज्यात राजकीय अने...
मुंबई । नगर सह्याद्री -
सुनावणीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या शिवसेना नाव, धनुष्यबाण शिंदे गटाला देण्याच्या निर्णयानंतर राज्यात राजकीय अनेक घडामोडी घडत आहे. शिंदे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर विधान भवनातील शिवसेना कार्यालय ताब्यात घेतले आहे. त्यानंतर आता संसदेतील शिवसेना कार्यालय शिंदे गटाच्या ताब्यात देण्यात आले आहे. संसदेतील सेना कार्यालय शिंदे गटाच्या ताब्यात गेल्याने उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे.
COMMENTS