पुणे । नगर सह्याद्री - पुण्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. काल म्हणजेच सोमवारी मध्यरात्री दोन वाजल्याच्या सुमारास भाजी मंडळीला आग लागली...
पुणे । नगर सह्याद्री -
पुण्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. काल म्हणजेच सोमवारी मध्यरात्री दोन वाजल्याच्या सुमारास भाजी मंडळीला आग लागली आहे. हडपसरमधील हांडेवाडी रस्ता, चिंतामणी नगर येथे भाजी मंडईला आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत मोठे नुकसान झाल्याची माहिती देखील मिळाली आहे. त्यामुळे आसपासच्या परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
जवळपास 90 स्टॉल आणि सर्व भाजीपाला व इतर साहित्य व दोन टेम्पोंचे नुकसान झाले आहे. त्यामुळे मध्यरात्रीच्या सुमाराच एकच गोंधळ उडाल्याचे समोर आले होते. आसपासच्या लोकांनी तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली आहे. तर अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी पोहोचले आहे. त्यानंतर आता आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले आहे.
COMMENTS