अहमदनगर | नगर सह्याद्री एका खासगी नोकरदार व्यक्तीच्या मोबाईलवर आलेली बनावट लिंक ओपन केल्याने मोबाईलमध्ये बेस नावाचे एक ऍप्लीकेशन इन्स्टॉल झ...
एका खासगी नोकरदार व्यक्तीच्या मोबाईलवर आलेली बनावट लिंक ओपन केल्याने मोबाईलमध्ये बेस नावाचे एक ऍप्लीकेशन इन्स्टॉल झाले. त्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून ७२ हजार रूपये कट होऊन फसवणूक झाली आहे. राहुल दत्तात्रय भिंगारदिवे (वय ३४ रा. भिंगारदिवे मळा, सावेडी) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहुल एका खासगी कंपनीत नोकरी करतात. त्यांचे एचडीएफसी बँकेत सेव्हिंग खाते आहे. १३ फेब्रुवारीला सकाळी त्यांच्या मोबाईल नंबरवर एका अनोळखी मोबाईल नंबरवरून लिंक आली. त्यांनी ती लिंक ओपन केल्याने मोबाईलमध्ये बेस’ ऍप्लीकेशन इन्स्ट्रॉल झाले. राहुल यांनी त्याकडे दर्लक्ष केले. दरम्यान १३ फेब्रुवारीला सायंकाळी त्यांच्या एचडीएफसी बँक खात्यातून दोन रूपये कट झाल्याचा मेसेज आला, त्यांनी त्याकडेही दुर्लक्ष केले. यानंतर १८ फेब्रुवारीला सकाळी ४९ हजार ९९९ रूपये व २२ हजार रूपये कट झाल्याचा त्यांना मेसेज आल्याने फसवणूक झाल्याचे राहुल यांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ बँकेशी संपर्क करून खाते बंद केले.
COMMENTS