संगमनेर | नगर सह्याद्री अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या अमृतवाहिनी मेधा महोत्सव २०२३ ची सुरुवात मेधा मॅरेथॉन ने झाली असून या ७ क...
संगमनेर | नगर सह्याद्री
अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या अमृतवाहिनी मेधा महोत्सव २०२३ ची सुरुवात मेधा मॅरेथॉन ने झाली असून या ७ किलोमीटरच्या स्पर्धेमध्ये ७०० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.
मेधा महोत्सव हा महाराष्ट्रातील सांस्कृतिक महोत्सव ठरला असून याची सुरुवात आज मॅरेथॉन ने झाली यशोधन जनसंपर्क कार्यालय ते इंजिनिअरिंग कॉलेज यादरम्यान झालेल्या या मॅरेथॉनमध्ये ७०० विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सहभाग घेतला या स्पर्धेचे उद्घाटन आमदार डॉ. सुधीर तांबे, संस्थेच्या विश्वस्त शरयूताई देशमुख, थलेटिक डॉ संजय विखे, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, प्राचार्य डॉ. एम. ए. वेंकटेश, मेधाचे समन्वयक प्रा. जी.बी. काळे, डॉ. मनोज शिरभाते, जे. बी. शेट्टी, शितल गायकवाड, प्रा. विलास शिंदे, प्रा. विजय वाघे यांसह विविध विभागांचे प्राचार्य व शिक्षक उपस्थित होते.
यशोधन कार्यालय ते इंजिनिअरिंग कॉलेज यादरम्यान ही स्पर्धा झाली. यावेळी सुरुवातीला मेधा ढोल पथकाने सर्वांचे स्वागत केले. मुलींनी पारंपारिक फेटे बांधून केलेले ढोल वादन हे आकर्षण ठरले. तर लहान गटातील विद्यार्थ्यांनी घुलेवाडी फाटा ते इंजिनिअरिंग कॉलेज यादरम्यान या मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेतला.
याप्रसंगी बोलताना आ. डॉ. तांबे म्हणाले की अमृतवाहिनी शिक्षण संस्थेचा मेधा सांस्कृतिक महोत्सव हा राज्याचा सांस्कृतिक मानबिंदू ठरला आहे. या अंतर्गत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात असून आरोग्याच्या दृष्टीने व्यायाम हा अत्यंत महत्त्वाचा आहे. अभ्यास व्यक्तिमत्व विकासासाठी विविध उपक्रम याचबरोबर व्यायाम ही त्रिसूत्री यावर्षी मेधामध्ये राबवण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग हे मेधाचे वैशिष्ट्य असल्याचे ते म्हणाले.
शरयूताई देशमुख म्हणाल्या की, यावर्षीचा मेधा हा विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी आयोजित केला असून मॅरेथॉन मध्ये मुलींचा असलेला सहभागा कौतुकास्पद आहे .प्रत्येकासाठी आरोग्य हे अत्यंत महत्त्वाचे असून नियमित व्यायाम हा तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा एक महत्त्वपूर्ण भाग बनला असल्याचे त्या म्हणाल्या.
या स्पर्धेत शिक्षकांमधून प्रा. विलास शिंदे यांनी प्रथम क्रमांक मिळवला तर मुलींमधून निकिता सुर्वे, वर्षा घुगे, अंकिता नवले, रितिका दिघे यांनी बक्षीस मिळवले. तर विद्यार्थ्यांमधून प्रतीक पावशे, विशाल पोरगे, विजय सोनवणे, लहान गटातून संकेत चौधरी, श्रीराम गरजे, तर मुलींमधून आदिती सानप, गीता चव्हाण यांनी पारितोषिक मिळाले. या मॅरेथॉन स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी मेधा स्पोर्ट्स कमिटी, शिस्त कमिटी व सोशल मीडिया कमिटीने विशेष परिश्रम घेतले.
COMMENTS