कान्हूर पठार | नगर सह्याद्री रयत शिक्षण संस्थेच्या जनता विद्या मंदिर कान्हूर पठार येथील आर्थिक दुर्बल घटकांसाठी घेण्यात येणार्या एनएमएम...
कान्हूर पठार | नगर सह्याद्री
रयत शिक्षण संस्थेच्या जनता विद्या मंदिर कान्हूर पठार येथील आर्थिक दुर्बल घटकांसाठी घेण्यात येणार्या एनएमएमएस परीक्षेमध्ये घवघवीत यश प्राप्त केले आहे. या परीक्षेमध्ये ५० विद्यार्थी पात्र ठरले आहेत.
विद्यालयाच्या इतिहासामध्ये प्रथमच एनएमएमएस परीक्षेमध्ये ५० विद्यार्थी येण्याचा विक्रम केला आहे. या सर्व विद्यार्थ्यांचा सन्मान स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य खंडेराय देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त चंद्रभान ठुबे यांनी प्रत्येक विद्यार्थ्यास गुलाब पुष्प व पेन भेट देऊन शाब्बासकीची थाप टाकली. विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर सुंदर व चांगले यावे व वळणदार यावे हा उद्दात्त हेतू ठेवून पेन देण्यात आले. उत्तीर्ण विदयार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यामध्ये हर्षदा ठुबे, वेदांत गुंड, साक्षी मंदिलकर, ओम बागले, साईनाथ वाळुंज, श्रद्धा सोनावळे, प्रदिप चत्तर, चैतन्य ठुबे, श्रावणी गुमटकर, साक्षी दुंधव, विजय परांडे, आदिती ठाणगे, साक्षी नवले, विशाखा ठुबे, प्रणवी वाळुंज, सोहम नवले, सोहम गाडगे, प्रतिक्षा ठुबे, निकिता मंदिलकर, अस्मिता बुचडे, उत्कर्षा भागवत, ओंकार ठुबे, नंदिनी पंडित, अथर्व लोंढे, गायत्री ठुबे, अश्विनी डोळस, भक्ती ठुबे, मुस्कान शेख, विजय भागवत, आमिन सय्यद, आयाज शेख, निकिता ठुबे, चेतन जगताप, अदिती वाळुंज, रोहन गव्हाणे, ईश्वरी गाडे, ओम गुंड, मंतशा इनामदार, दिशा नवले, सार्थक ठुबे, ओंकार सोनावळे, आयान शेख, गायत्री वर्हाडी, राजश्री ठुबे, रोहन ठुबे, स्नेहल गायकवाड, आदित्य गुंजाळ, आदित्य रोकडे, दूर्गेश्वरी गायकवाड, सार्थक मोरे त्याचबरोबर या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन त्यांची परीक्षेची तयारी करुन घेणार्या शिक्षक यांचाही सन्मान शाल श्रीफळ देऊन करण्यात आला. यामध्ये एनएमएमएस परीक्षेचे विभाग प्रमुख ओमप्रकाश देंडगे, महेशकुमार साबळे, महेश माने, मच्छिंद्र नागरगोजे, वैशाली सुंबे यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी गावातील प्रमोद खामकर, प्रसाद नवले, गोकुळ व्यवहारे, प्राचार्य. बाबासाहेब वमने, पर्यवेक्षक जयसिंग ठुबे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक प्रमुख सुहास गोरडे यांनी केले.
COMMENTS