मुंबई : अनेकवेळा बॉलिवूडमध्ये कास्टिंग काउच झाल्याचा आरोप काही अभिनेत्रींकडून करण्यात आला आहे. आता कास्टिंग काउच हे फक्त बॉलिवूडच नाही तर ट...
मुंबई : अनेकवेळा बॉलिवूडमध्ये कास्टिंग काउच झाल्याचा आरोप काही अभिनेत्रींकडून करण्यात आला आहे. आता कास्टिंग काउच हे फक्त बॉलिवूडच नाही तर टेलिव्हिजन, साऊथ फिल्म इंडस्ट्री आणि भोजपुरी सिनेमासृष्टीतही होताना दिसून येत आहे. भोजपुरी सिनेमांमध्ये काम करणार्या एका अभिनेत्रीने असा आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. साजिद खान याने घरी बोलावून नको ते करायला सांगितले. साजिद खान याने घरी बोलावून म्हटले - ’अपनी स्कर्ट उठाओ, ब्रेस्ट साइज बताओ’. हा गंभीर आरोप कास्टिंग काउची शिकार झालेल्या अभिनेत्रीने केला आहे. भोजपुरी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री राणी चॅटर्जी देखील कास्टिंग काउचची शिकार झाली असली तरी तिला बॉलिवूडमध्ये हा अनुभव आला होता. वास्तविक, राणीने २०१३ मध्ये फिल्ममेकर साजिद खान याची ’हिम्मतवाला’ सिनेमाच्या संदर्भात भेट घेतली होती. जिथे तिला कास्टिंग काउचला सामोरे जावे लागले होते. जेव्हा साजिद बिग बॉस १६ मध्ये स्पर्धक म्हणून पोहोचला तेव्हा राणीने स्वतः ही घटना सोशल मीडियावर शेअर केली आहे. राणीने सोशल मीडियावर एक मोठी पोस्ट लिहिली आहे, ज्यामध्ये तिने सांगितले की, तो बॉलिवूडचा खूप मोठा दिग्दर्शक असल्याने मी फोनवर त्याचे बोलणे ऐकले. त्याने मला घरी बोलावले आणि मी त्याच्या जुहूच्या घरी गेले जिथे तो एकटाच होता. सुरुवातीला त्याने मला ’धोखा धोखा’ या गाण्यासाठी मला कास्ट करायचे आहे, ज्यामध्ये मला छोटा लेहेंगा घालावा लागेल, असे सांगितले. त्यामुळे त्याने मला माझे पाय दाखवायला सांगितले. मी त्यावेळी लांब स्कर्ट घातला होता, त्यामुळे त्याला मला गुडघ्यापर्यंत उचलाला लागला होता.
COMMENTS