पारनेर महाविद्यालयाच्या वतीने विशेष सत्कार पारनेर | नगर सह्याद्री- दुष्काळी पारनेरच्या मातीला संघर्ष...
पारनेर महाविद्यालयाच्या वतीने विशेष सत्कार
पारनेर | नगर सह्याद्री-
दुष्काळी पारनेरच्या मातीला संघर्षाचा इतिहास असुन सामाजिक राजकीय शैक्षणिक जीवनात केलेल्या कष्टामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा जीवनसाधना पुरस्कार मिळाला असल्याची प्रतिक्रिया जिल्हा मराठा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार नंदकुमार झावरे यांनी सांगितले आहे. सावित्री बाई फुले पुणे विद्यापीठाने नंदकुमार झावरे पाटील यांना जीवनसाधना गौरव पुरस्कार प्रदान करून सन्मानित केले. त्याबद्दल पारनेर येथील न्यू आर्टस्, कॉमर्स अॅण्ड सायन्स महाविद्यालयात त्यांच्या विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
यामुळेच समाज जीवनामध्ये मला कार्य करताना तालुयातील लोकांकडून मिळालेली प्रेरणा ही खरोखर अनमोल अशी आहे. या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना डॉ.भास्कर झावरे म्हणाले, नंदकुमार झावरे पाटील यांनी राजकीय सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात केलेलं कार्य हे तळागाळातील कष्टकरी, वंचित व बहुजन समाजातील सर्वांना प्रेरणा देणारे कार्य आहे. त्याबरोबरच सर्व समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन जाण्याची त्यांची भूमिका राहिलेली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने त्यांना जीवनसाधना गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.
जनसामान्यांसाठी सातत्याने संघर्ष करणारे नेतृत्व; सीताराम खिलारीनंदकुमार झावरे आणि मी सोबतच राजकीय क्षेत्रात पदार्पण केले. पारनेर तालुयातील सर्व शाळा, महाविद्यालयांची स्थापना करण्यासाठी त्यांनी केलेला संघर्ष मी जवळून अनुभवला आहे. विधानसभेत त्यांनी अनेक महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करून पारनेर तालुयासाठी केलेले कार्य हे अनमोल असे आहे. त्यांच्या या कार्याची दखल तत्कालीन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष यांनी सुद्धा वेळोवेळी घेतलेली आहे. त्यांना मिळालेला सन्मान हा खर्या अर्थाने पारनेरच्या जनतेचा सन्मान आहे, असे संस्थेचे ज्येष्ठ विश्वस्त सिताराम खिलारी म्हणाले.
याप्रसंगी बोलताना डॉ. रंगनाथ आहेर म्हणाले, पारनेर महाविद्यालयाची उभारणी करताना सुरुवातीला जो संघर्ष करावा लागला. त्यामध्ये झावरे यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे.अनेक विद्यार्थी आंतरराष्ट्रीय, पातळीवर यशस्वीपणे वाटचाल करत आहेत.प्रास्ताविक राहुल झावरे पाटील यांनी केले. कार्यक्रमाला प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापक या कार्यक्रमाचे आभार डॉ. हरेश शेळके यांनी मानले
या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे ज्येष्ठ विश्वस्त सिताराम खिलारी, प्राचार्य डॉ. भास्करराव झावरे, संस्थेचे सदस्य राहुल नंदकुमार झावरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रंगनाथ आहेर, उपप्राचार्य डॉ. दिलीप ठुबे, प्राचार्य डॉ. सहदेव आहेर, प्राचार्य डॉ.लक्ष्मण मतकर हे उपस्थित उपस्थित होते. या कार्यक्रम प्रसंगी बोलताना नंदकुमार झावरे पाटील म्हणाले, तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचणे हाच अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचा मुख्य उद्देश आहे. शेतकरी, कष्टकरी, वंचित, बहुजन,मजूर या सर्व घटकाला केंद्रवर्ती ठेवून समाजासाठी सतत कार्यरत राहणे हेच पारनेर तालुयाच्या मातीने मला शिकविले. पारनेर तालुका हा सातत्याने दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. परंतु येथे गुणवत्ता असणार्या व्यक्तींची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे.
COMMENTS