अलिया भट्ट, रणबीर कपूर ठरले सर्वोत्कृष्ठ मुंबई : एस. एस. राजामौली दिग्दर्शित ’आरआरआर’ आणि विवेक अग्निहोत्री यांच्या ’द काश्मीर फाइल्स’ या च...
अलिया भट्ट, रणबीर कपूर ठरले सर्वोत्कृष्ठ
मुंबई : एस. एस. राजामौली दिग्दर्शित ’आरआरआर’ आणि विवेक अग्निहोत्री यांच्या ’द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटांचा दादासाहेब आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. ‘आरआरआर’ चित्रपटाला फिल्म ऑफ द इयर आणि ’द काश्मीर फाइल्स’ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार देण्यात आला.
सोमवारी सायंकाळी मुंबईत पुरस्कार सोहळा झाला. सोहळ्यात अभिनेत्री आलिया भट्टला ’गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला. ’ब्रह्मास्त्र’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून रणबीर कपूरची निवड करण्यात आली. ’कांतारा’ फेम अभिनेता ऋषभ शेट्टीची सर्वोत्कृष्ट प्रॉमिसिंग अॅटर म्हणून निवड करण्यात आली. वरुण धवनला ’भेडिया’साठी क्रिटिस बेस्ट अवॉर्ड, अभिनेते अनुपम खेर यांना ’द काश्मीर फाइल्स’साठी मोस्ट व्हर्सटाइल अॅटर म्हणून गौरविले. रेखा यांचा चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल गौरव करण्यात आला.
COMMENTS