अहमदनगर । नगर सह्याद्री - अहमदनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. केडगाव बायपास येथील हाॅटेल के 9 समोरील एका बंद ढाब्याजवळ एका ४० वर्षीय व...
अहमदनगर । नगर सह्याद्री -
अहमदनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. केडगाव बायपास येथील हाॅटेल के 9 समोरील एका बंद ढाब्याजवळ एका ४० वर्षीय व्यक्तीची डोक्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. घटना गुरुवारी मध्यरात्री घडली आहे. शिवाजी किसन ऊर्फ देवा होले (रा. कल्याण रोड, नगर) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत अरुण नाथा शिंदे (वय -४५) यांनी फिर्याद दिली असून फिर्यादीत म्हंटले आहे की, दि.२३ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास केडगाव शिवारातील केडगाव बायपास रोडवर हॉटेल के ९ जवळ एक बंद ढाब्याजवळ शिवाजी होले अंधारात दारु पित बसलेले असताना केडगाव बायपास रोडकडुन दोन अज्ञात व्यक्ती आले व म्हणाले आम्ही, येथे दारु पिवु का? असे विचारत त्यानंतर ते दोघे आम्हाला काही एक न बोलता केडगाव बायपास रस्त्याकडे निघून गेले त्यानंतर दोन अनोळखी व्यक्तीसोबत आणखी एक व्यक्ती आला. त्यातील एका व्यक्तीच्या हातात चाकु व दुसऱ्या व्यक्तीच्या हातात पिस्तूल होती. त्यातील एका व्यक्तीने गळयाला चाकु लावत खिशातील पैसे काढून घेतले आहे. शिवाजी होले रस्त्याच्या दिशेने पळाले असताना त्या तिघांनी पिस्तूलने शिवाजी होले यांच्यावर गोळी झाडली आहे. यात शिवाजी होले यांचा मृत्यू झाला तसेच दुसऱ्याच्या मानेला चाकु लावुन बळजबरीने तीन हजार रुपये रोख रक्कम, मोबाईल काढून डोळयात मिर्ची पावडर फेकुन ते अनोळखी तीन इसम केडगाव बायपास रस्त्याच्या दिशेने पळुन गेले आहे. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
COMMENTS