जालना/ नगर सह्याद्री- जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील बेलोरा तांड्यावर पंधरा दिवसांपूर्वी साखरपुडा झालेल्या तरुणाने, बोहल्यावर चढण्याआधी...
जालना/ नगर सह्याद्री-
जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील बेलोरा तांड्यावर पंधरा दिवसांपूर्वी साखरपुडा झालेल्या तरुणाने, बोहल्यावर चढण्याआधीच होणाऱ्या बायकोचा शनिवारी दुपारी एकच्या सुमारास गळा चिरून खून केल्याची घटना घडली असून परिसरात खळबळ उडाली आहे. हत्या करणारा सुशील पवार हा नवरदेव फरार झाला आहे. मयत दीप्ती संदीप जाधव ही अल्पवयीन असल्याचं समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,बेलोरा तांडा येथील सपना संदीप जाधव (वय 17 वर्षे) हिचा विवाह बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील वरूड येथील सुशील पवार या तरुणासोबत ठरला होता. सर्वकाही बोलणं झाल्यावर 15 दिवसांपूर्वीच सपना आणि सुशील यांचा साखरपुडा झाला.दोन्ही कुटुंबातील सदसदस्य ठरल्याप्रमाणे शनिवारी लोणार येथे बस्ता बांधण्यासाठी गेले होते.
यावेळी सुशील देखील बस्ता खरेदी करण्यासाठी गेला होता. बस्ता खरेदी करत असतानाच सुशील तेथून थेट बेलोरा तांडा येथे गेला. यावेळी सपना घरी एकटीच होती.घरी गेल्यावर त्याने सपनावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आणि दोघांमध्ये वादावादी झाली.त्यातूनच त्याने सोबत आणलेल्या चाकूने गळा चिरून सपनाची हत्या केली.घरातील लहान मुलांनी तत्काळ ग्रामस्थांना माहिती दिली.मात्र तोपर्यंत संशयित आरोपी सुशील फरार झाला होता.
गावकऱ्यांनी याची माहिती सेवली पोलिसांना दिली, माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.सपना रक्ताच्या थारोळ्यात पडली होती.घटनेची गांभीर्य लक्षात घेऊन गावकऱ्यांनी बस्ता बांधण्यासाठी गेलेल्या दोन्हीकडच्या मंडळींना वेगळं कारण सांगत तात्काळ बोलावून घेतलं व गावात आलेल्या वराकडील मंडळींना एका घरात सुरक्षित कोंडून ठेवलं. त्यामुळे पोलीस येईपर्यंत ते सुरक्षित राहिले अन्यथा रागाच्या भरात वधुकडील मंडळींकडून अनुचित प्रकार घडला असता.
COMMENTS