अहमदनगर । नगर सह्याद्री- नगर शहरातील मुख्य प्रवाहातील दैनिके, साप्ताहिकांचे संपादक, पत्रकारांसाठी अधिकृत वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी यांच्यास...
अहमदनगर । नगर सह्याद्री-
नगर शहरातील मुख्य प्रवाहातील दैनिके, साप्ताहिकांचे संपादक, पत्रकारांसाठी अधिकृत वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी यांच्यासाठी नगर प्रेस क्लब या संघटनेची घोषणा रविवारी करण्यात आली. संघटनेची नोंदणी प्रक्रिया व निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊन नव्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे. प्रेस क्लबचे हंगामी कार्यकारी मंडळ निवडले असून क्लबच्या अध्यक्षपदी अनंत पाटील (सार्वमत) आणि सरचिटणीसपदी शिवाजी शिर्के (नगर सह्याद्री) यांची निवड करण्यात आली. तीन महिन्यात नोंदणी प्रक्रिया पार पाडून नव्याने निवडणूक प्रक्रिया राबविण्याची घोषणा अनंत पाटील यांनी केली.
लोकमतचे आवृत्ती प्रमुख सुधीर लंके, संदीप रोडे, बाळासाहेब धस, उमेर सय्यद यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हंगामी कार्यकारिणी निवडण्यात आली. निवडलेली हंगामी कार्यकारिणी अशी; उपाध्यक्ष- अण्णासाहेब नवथर (लोकमत) व मुरलीधर कराळे (सकाळ), सरचिटणीस- शिवाजी शिर्के (नगर सह्याद्री), सहचिटणीस- मिलींद देखणे (सामना), खजिनदार- राजेंद्र झोंड (पुण्यनगरी),
कार्यकारिणी सदस्य- सूर्यकांत वरकड (पुढारी), प्रशांत वाव्हळ (अजिंक्य भारत), मोहिनीराज लहाडे (लोकसत्ता), जयंत कुलकर्णी (प्रभात), रोहित सोनवणे (लोकमंथन), अशोक झोटींग (मराठवाडा केसरी), मनोज मोतियानी (अहमदनगर घडामोडी), शिरीष कुलकर्णी (नवभारत), राजू खरपुडे (छायाचित्रकार), आदिल रियाज शेख (साप्ताहिक प्रतिनिधी), सुशील थोरात (इलेक्टॉनिक मीडिया प्रतिनिधी).
शहारातील पत्रकारांसाठी स्थापन झालेल्या या नव्या संघटनेच्या माध्यमातून पत्रकार परिषदांचे आयोजनासह पत्रकारांच्या हिताचे वेगवेगळे उपक्रम राबविले जाणार असल्याची माहिती कार्यकारी मंडळाचे हंगामी अध्यक्ष अनंत पाटील यांनी दिली.
COMMENTS