पारनेर । नगर सह्याद्री- तालुक्यातील राळेगण सिद्धी येथील शहीद जवान कॅप्टन सौरभ भागूजी औटी (वय-26) यांना 2 दिवसापूर्वी लेह काश्मीर येथे कर्त...
पारनेर । नगर सह्याद्री-
तालुक्यातील राळेगण सिद्धी येथील शहीद जवान कॅप्टन सौरभ भागूजी औटी (वय-26) यांना 2 दिवसापूर्वी लेह काश्मीर येथे कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले. कॅप्टन सौरभ औटी यांचे कर्तव्य बजावत असताना अपघाती निधन झाले असून सोमवारी मुळ गावी त्यांचा पार्थिव देह आणल्यानंतर शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. एनडीए माध्यमातून शिक्षण घेऊन ते भारतीय सैन्य दलात चार वर्षांपूर्वी दाखल झाले.
भारतीय सैन्यामध्ये आपले कर्तव्य बजावत असताना त्यांचा अपघात झाला. त्यांचे पार्थिव सोमवारी मूळ गावी राळेगण सिद्धी येथे आणले असता ज्येष्ठ समाजसेवक हजारे व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी पुष्पचक्र वाहिले व अंत्यदर्शन घेऊन श्रदांजली अर्पण केली.
राळेगण सिद्धी येथील शिक्षणसंस्थेचे जेष्ठ संचालक नानाभाऊ औटी यांचे नातू व पोलीस निरीक्षक भागूजी औटी यांचे चिरंजीव व राळेगण सिद्धी परिवाराच भूषण एनडीए मध्ये प्रशिक्षण पूर्ण करून भारतीय सेनेत कॅप्टन असणारे कॅप्टन सौरभ औटी वयाच्या 26 व्या वर्षी वीरगती मिळाली. शहीद कॅप्टन सौरभ औटी यांना भारतीय सैन्य दलातर्फे व राळेगण सिद्धी परिवाराच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली.
COMMENTS