मुंबई / नगर सहयाद्री - सध्या बॉलिवूड अभिनेत्रींचे आकर्षण दक्षिणेतही पाहायला मिळत आहे. दाक्षिणात्य चित्रपटांची ताकद ओळखून हिंदी चित्रपटसृष्ट...
मुंबई / नगर सहयाद्री -
सध्या बॉलिवूड अभिनेत्रींचे आकर्षण दक्षिणेतही पाहायला मिळत आहे. दाक्षिणात्य चित्रपटांची ताकद ओळखून हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री दक्षिणेकडे वळत आहेत. अलीकडेच आलिया भट्ट RRR मध्ये दिसली, तर आता जान्हवी कपूरबद्दलही अशाच बातम्या येत आहेत. त्या चित्रपटासाठी ४ कोटी रुपये घेतले आसल्यची माहिती समोर आली आहे.
वृत्त संस्थाच्या माहितीनुसार, अलीकडेच श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर साऊथ सुपरस्टार ज्युनियर एनटीआरसोबत रोमान्स करणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. होय त्या खरोखर आहेत. जान्हवी कपूर तिच्या पहिल्या साऊथ चित्रपटासाठी चर्चेत आहे, यात ती सुपरस्टार ज्युनियर एनटीआर सोबत दिसणार आहे. रिपोर्ट्सनुसार, जान्हवीने या चित्रपटासाठी ४ कोटी रुपये घेतले आहेत. जान्हवीचा हा पहिला दाक्षिणात्य चित्रपट आहे. इतके असूनही ती निर्माता-दिग्दर्शकाकडून एवढी मोठी रक्कम घेत आहे.
दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक कोरटाला सिवा या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. हा चित्रपट मुळात तेलुगुमध्ये बनवला जात आहे. तथापि, हा पॅन इंडिया चित्रपट असेल म्हणजेच तेलुगूसह तमिळ, मल्याळम आणि हिंदीसह अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सैफ अली खानचीही एन्ट्री झाली आहे.
COMMENTS