पारनेर । नगर सह्याद्री- 19 फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके यांनी वैष्णोदेवी यात्रे दरम्यान जम्मूच्या रेल्वे स्थानकाव...
पारनेर । नगर सह्याद्री-
19 फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके यांनी वैष्णोदेवी यात्रे दरम्यान जम्मूच्या रेल्वे स्थानकावरच शिवजयंती साजरी करत जय भवानी जय शिवाजी नारा देत परिसर दुमदुमून टाकला. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य राजेंद्र चौधरी, कारभारी पोटघन मेजर यांच्यासह प्रितेश पानमंद यांच्या सह निलेश लंके प्रतिष्ठानचे कार्यकर्ते व महिला सहभागी झाल्या होत्या.
हिंदवी स्वराज्याचा भगवा झेंडा अटकेपार फडकविणारे, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजयंती जम्मु रेल्वे स्थानकावर साजरी करणारे महाराष्ट्रातील एकमेव आमदार नीलेश लंके ठरले आहेत. सालाबाद प्रमाणे सलग 20 वर्षापासून पारनेर तालुक्यातील युवकांसाठी, वयोवृद्ध तसेच माता भगिनीसाठी वैष्णोदेवी यात्रा अविरत सुरू आहे. यापूर्वीही आग्रा येथील लाल किल्ल्यावर असणार्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास अभ्यांगस्नान व पुष्पहार अर्पण करनारे महाराष्ट्रातील एकमेव आमदार लंके होते.
COMMENTS