सोलापूर/नगर सह्याद्री- शेतमालाला योग्य दर मिळत नाहीत ही बाब नेहमीची झाली आहे. सोलापूरच्या राजेंद्र चव्हाण या शेतकऱ्याला आलेला अनुभव अत्यंत...
सोलापूर/नगर सह्याद्री-
शेतमालाला योग्य दर मिळत नाहीत ही बाब नेहमीची झाली आहे. सोलापूरच्या राजेंद्र चव्हाण या शेतकऱ्याला आलेला अनुभव अत्यंत विदारक असून १० गोणी कांदा विकून त्याच्या पदरात फक्त २ रुपये पडले आहेत.शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी ज[ बाब उघडकीस आणली असून सरकारला लाज वाटली पाहिजे, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
सोयाबीन, कापूस, तूर, कांदा इत्यादी शेतमालाला योग्य दर मिळत नाहीत. सध्या कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे.राज्यातील शेतकऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण आहे.कांद्याच्या १ एकर क्षेत्रासाठी कमीत कमी ५० हजार रुपये खर्च येतो.सध्या शेतकऱ्यांना मार्च महिन्यापूर्वी बँकेच्या कर्जाची परतफेड करायची आहे. त्यामुळं शेतकरी इच्छा नसली तरी शेतमाल बाजारात विकत आहे..
सोलापूरचे शेतकरी राजेंद्र चव्हाण या शेतकऱ्यानं ५१२ किलो कांदा व्यापाऱ्याला विकला.त्या कांद्याला १ रुपये किलोचा दर मिळाला. त्यांच्या मालाचे ५१२ रुपये झाले.हमाली, तोलाई, भाडे, रोख उचल यासाठी त्यातील ५०९.५१ रुपये कापून घेण्यात आले. त्यातून राहिलेली २.४९ रुपयांची रक्कम देण्यासाठी शेतकऱ्याला केवळ २ रुपयांचा चेक देण्यात आला.तोही पुढील १५ दिवसांचा.या चेकवर ८ मार्च ही तारीख टाकण्यात आली आहे. राजू शेट्टी यांनी राज्यकर्त्यांनो जरा तरी लाज बाळगा, शेतकऱ्यांनी जगायचं कसं हे आता तुम्हीच सांगा?व्यापाऱ्याला दोन रूपयांचा चेक देताना लाज कशी वाटली नाही,अशा शब्दात राजू शेट्टी यांनी संताप व्यक्त केला.
COMMENTS