पारनेर / नगर सहयाद्री - टाकळी ढोकेश्वर येथील मा.नंदकुमार झावरे पा. पतसंस्थेच्या चेअरमनपदीसिताराम खिलारी सर यांची तर उपाध्यक्षपदी वसंतराव साल...
पारनेर / नगर सहयाद्री -
टाकळी ढोकेश्वर येथील मा.नंदकुमार झावरे पा. पतसंस्थेच्या चेअरमनपदीसिताराम खिलारी सर यांची तर उपाध्यक्षपदी वसंतराव सालके यांची निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक श्री.गणेश औटी यांच्या अध्यक्षतेखाली बिनविरोध निवड करण्यात आली.
मा.नंदकुमार झावरे पा.सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाची सन.२०२२/२३ ते २०२७/२८ या कालावधीसाठी नुकतीच बिनविरोध निवडणुक पार पडली.निवड झालेल्या संचालकाची निवडणूक निर्णय अधिकारी श्री.गणेश औटी यांच्या अध्यक्षतेखाली पदाधिकारी निवडीसाठी सभा घेण्यात आली.यावेळी चेअरमनपदासाठी सिताराम खिलारी सर यांचा एकमेव अर्ज आला त्यांना सुचक म्हणून सुधाकर जाधव यांनी तर बाळासाहेब इघे यांनी अनुमोदन दिले तर व्हा.चेअरमनपदासाठी श्री वसंतराव सालके यांचा एकमेव अर्ज आला त्यांना सुचक म्हणून डॉ. नामदेव कदम तर डॉ. रंगनाथ आहेर यांनी अनुमोदन दिले.सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संस्थेचे मॅनेजरअशोकराव वाळुंज यांनी काम पाहिले.
निवडीनंतर नुतन पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.निवडीच्या वेळी संचालक सर्वश्री प्राचार्य डॉ. भास्करराव झावरे, अच्युतराव जगदाळे, सुधाकर जाधव,प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर,डॉ. भाऊसाहेब खिलारी,प्राचार्य डॉ. नामदेव कदम,बाळासाहेब इघे,संचालिका सौ.प्रिया झावरे,सौ.अलका उदावंत आदी उपस्थित होते.संस्थेचे मार्गदर्शक मा.आ.नंदकुमार झावरे पा.यांनी सर्व वनिर्वाचित पदाधिका-यांचे अभिनंदन केले आहे.निवडीनंतर नुतन पदाधिकाऱ्यांनी संस्थेच्या सर्व सभासद, खातेदार हितचिंतक यांचे आभार व्यक्त केले.
COMMENTS