हिंगोली / नगर सहयाद्री- महाराष्ट्रात वारंवार गुन्ह्यांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. पण अशात पती-पत्नीमधील वादामुळे गुन्हे होण्याचं प्रमाणही व...
हिंगोली / नगर सहयाद्री-
महाराष्ट्रात वारंवार गुन्ह्यांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. पण अशात पती-पत्नीमधील वादामुळे गुन्हे होण्याचं प्रमाणही वाढलं आहे. आपली पत्नी शेजाऱ्यासोबत संबंध प्रस्थापित करत पत्नीच्या अनैतिक वर्तनास कंटाळून पतीने गावाकडे येऊन बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पत्नी व तिच्या प्रियकराविरुद्ध मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त महितीनुसार, कामानिमित्ताने हे कुटुंब औरंगाबाद येथे बजाजनगर येथे भाड्याने राहत होते. शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीसोबत पत्नीचे प्रेम संबंध निर्माण झाले. पतीचा ते लक्षात आल्या नंतर दोघाचे बिनसत गेले. पतीने ही बाब आई, भाऊ, सासू-सासरे यांच्या कानावर घातली. सर्वांनी तिची समजूत काढली व नीट राहण्याबाबत समज दिली.
पतीने पत्नी व तिच्या प्रियकराला नीट राहण्याबाबत समजावले. परंतु, त्या दोघांनी पतीलाच धमकी दिली. 'तू आमच्यामध्ये पडू नकोस', असा सज्जड दम देत जिवे मारण्याची धमकी दिली. एके दिवशी प्रियकरासोबत ती मुले पतीजवळ सोडून निघून गेली. त्यानंतर तो आपल्या मूळ गाव जरोडा इथे परतला व नातेवाईकांना सांगून माझ्या जीवनात काही अर्थ नाही, असे म्हणाला. ३१ जानेवारी रोजी त्याने जरोडा गावातील आबादानीजवळील एका बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.
मिळालेल्या माहितीनुसार, मयत दोन मुली व एक मुलगा अशी तीन अपत्य आहे. या प्रकरणी फिर्यादी नुसार, पत्नी व तिचा प्रियकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी प्रियकराचे नाव विचारले असता मयताच्या घरच्यांना प्रियकराचे पूर्ण नाव माहिती नाही, असे सांगितले. या प्रकरणाचा तपास पोलीस करीत आहेत.
COMMENTS