मुंबई / नगर सहयाद्री - राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू झालं आहे. त्यात सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने उभे ठाकले आ...
मुंबई / नगर सहयाद्री -
राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू झालं आहे. त्यात सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने उभे ठाकले आहेत. सभागृहात नवनिर्वाचित सदस्यांचा परिचय करून दिला. दरम्यान, विधान परिषदेचे सदस्य सत्यजित तांबे काँग्रेस सदस्यांपासून अंतर राखताना दिसून आले. त्यामुळे या राजकीय घडामोडींकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
वृत्तसंस्थाच्या महतीनुसार, विधान परिषदेचे कामकाज दुपारी बाराच्या सुमारास सुरू झाले. त्यानंतर संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नवनिर्वाचित सदस्यांची सभागृहात परिचय करून दिला. त्यांनी छत्रपती संभाजीनगर शिक्षक मतदारसंघातून विक्रम काळे, नागपूर शिक्षक मतदारसंघातून सुधाकर गोविंदराव अडबल, नाशिक पदवीधर मतदारसंघातून सत्यजित तांबे, कोकण शिक्षक मतदारसंघातून ज्ञानेश्वर म्हात्रे आणि अमरावती पदवीधर परिषदेचे धीरज लिंगाडे यांचा परिचय करून देत स्वागत केले.
नाशिक पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेले विधान परिषदेचे सदस्य सत्यजित तांबे यांनी एकनाथ खडसे यांच्या आसनाजवळ जाऊन त्यांना वाकून नमस्कार केला. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांना हात जोडून अभिवादन केले. तांबे यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेनेचे सचिन अहिर (उद्धव ठाकरे गट), सुनील शिंदे आणि अन्य आमदारांचीही भेट गाठी घेतल्या. मात्र, ते काँग्रेस सदस्यांपासून अंतर राखताना दिसून आले.
COMMENTS