मुंबई / नगर सहयाद्री - दिवाळी निम्मित शिंदे-फडणवीस सरकारने १०० रुपयांत आनंदाचा शिधा गोरगरीब जनतेला दिला होता. त्याचप्रमाणे आज पार पडलेल्या...
मुंबई / नगर सहयाद्री -
दिवाळी निम्मित शिंदे-फडणवीस सरकारने १०० रुपयांत आनंदाचा शिधा गोरगरीब जनतेला दिला होता. त्याचप्रमाणे आज पार पडलेल्या बैठकीत गोरगरिबांना गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना १०० रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय जाहीर केला आहे
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षस्थानी बैठक पार पडली. या बैठकीत ज्याप्रमाणे दिवाळीला राज्यातील जनतेला शिंदे-फडणवीस सरकारने १०० रुपयांत आनंदाचा शिधा दिला होता. त्याचप्रमाणेन गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना १०० रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय हा मोठा घेतला आहे.
गोरगरीब कुटुंबांसाठी राज्य सरकारने केवळ शंभर रुपयांमध्ये एक लिटर पामतेल आणि प्रत्येकी एक-एक किलो साखर, रवा, चणाडाळ या चार वस्तूंचे किट देण्याचा निर्णय घेतला आहे. अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब तसेच शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील एपीएल (केसरी) रेशनकार्डधारकांना हा शिधा शंभर रुपयांमध्ये मिळणार आहे. राज्यातील १ कोटी ६३ लाख शिधा पत्रिकाधारकांना याचा लाभ होईल असे कळविण्यात आले आहे.
COMMENTS