गौतमीचा अहमदनगर जिल्ह्यातील राहाता येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता
अहमदनगर / नगर सहयाद्री -
गौतमीचा अहमदनगर जिल्ह्यातील राहाता येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. लावणी डान्सर गौतमी पाटील ही कायमच चर्चेत असते.तिच्या कार्यक्रमाला तुफान गर्दी होत असते. राहता येथील कार्यक्रमात राडा झाला आहे. कार्यक्रम सुरू असताना काही तरुणांनी हुल्लडबाजांनी गोंधळ घातला, त्यास आवर घालण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. कार्यक्रमस्थळी प्रेक्षकांची चांगलीच धावपळ उडाली.
प्राप्त माहीती नुसार गौतमी पाटीलच्या अहमदनगर जिल्ह्यमधील कार्यक्रमात पुन्हा एकदा राडा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. आयोजित कार्यक्रम सुरू असताना अचानक काही हुल्लडबाजांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. या हुल्लडबाजांना आवरण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. गौतमीचा डान्स सुरू असताना काही प्रेक्षकांकडून पैशांची उधण करण्यात आली, यावरूनच हा गोंधळ सुरू झाला. या गोंधळामुळे गौतमीने डान्स थांबवला. डान्स थांबवण्यामुळे गोंधळ आणखी वाढला. प्रेक्षकांनी कार्यक्रमस्थळी राडा घालण्यास सुरुवात केली.
कार्यक्रम ऐन जोमात असताना काही प्रेक्षकांनी गौतमीवर पैशाची उधळण सुरू केली. त्यामुळे गौतमीने नाराजी व्यक्त करत डान्स थांबवला आणि स्वतः माईक हातात घेत प्रेक्षकांना गोंधळ न करण्याची विनंती केली. शांत राहण्याचं आवाहन करूनही प्रेक्षक ऐकत नसल्यानं अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत गर्दीला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही गोंधळ सुरूच राहिल्याने अखेर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. या प्रकारानंतर मोठ्या पोलीस बंदोबस्तात गौतमीला कार्यक्रमस्थळावरून बाहेर काढण्यात आले.
COMMENTS