मुंबई / नगर सहयाद्री - मुंबईतील बोरिवली (पूर्व) मागाठाणे विधानसभा मतदारसंघातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे य...
मुंबई / नगर सहयाद्री -
मुंबईतील बोरिवली (पूर्व) मागाठाणे विधानसभा मतदारसंघातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसैनिकांमध्ये वाद होण्याची शक्यता आहे.हा वाद श्रीकृष्ण नगर पूल सुरू करण्याच्या मागणीसाठी होत आसुन आज ठाकरे गटाचे माजी नगरसेवक भास्कर खुरसुंगे हे पुल सुरु करण्यासाठी शिवसैनिकांसह उपोषण करणार होते. पोलिसांनी त्याना आंदोलन करण्यापासून रोखले. त्यामुळे या परिसरात तणावाचे वातावरण आहे.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, श्रीकृष्ण नगर पुलाचे काम हे वर्षभरापासून रखडलेले होते. शिवसैनिकांच्या आंदोलनानंतर त्यांचे काम सुरू झाले. आता पुलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. पण तो पूल लोकांसाठी खूला करावा अशी मागणी ठाकरे गटाचे माजी नगरसेवक भास्कर खुरसुंगे यांनी केली आहे. त्या संदर्भात आज शिवसैनिक आंदोलन करणार होते. मात्र श्रीकृष्ण नगर पुलाचे उद्घाटन 5 मार्चला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळेच हा पूल जनतेसाठी अद्याप खुला करता येणार नाही. अशा आरोप ठाकरे गटाचे माजी नगरसेवक भास्कर खुरसुंगे यांनी केला आहे.
शिवसैनिकांनी हा पूल खुला करण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू केले, मात्र, स्थानिक पोलिसांनी त्यांना तात्काळ ताब्यात घेतले. मोठ्या संख्येने शिवसैनिक श्रीकृष्णनगरच्या पुलाजवळ जमा झाले. त्यामुळे दहिसर आणि मागाठाणे विधानसभा मतदारसंघात राजकीय तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. श्रीकृष्ण नगर ब्रीझ परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.
त्यानंतर शिंदे गटाचे स्थानिक आमदार प्रकाश सुर्वे म्हणाले, श्रीकृष्ण नगरच्या पुलाचे काम माझ्या प्रयत्नातून झाले आहे. त्याच्या बांधकामाची काही कामे करणे बाकी आहे. जे काही दिवसात पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्यानंतर हा पूल जनतेसाठी खुला करण्यात येणार आहे. माजी नगरसेवक भास्कर खुरसुंगे हे त्यांच्या कामांचे खोटे श्रेय घेण्यासाठी आंदोलनाचे नाटक करत आहेत. आमदार सुर्वे यांनी ठाकरे गटाच्या नेत्यांवर मुंबईचे वातावरण बिघडवल्याचा आरोप केला.
COMMENTS