मुंबई / नगर सहयाद्री - दादासाहेब फाळके ह्यांच्या जन्मशताब्दीवर्षापासून हे पुरस्कार दिले जाता असून याचे वितरण माहिती व प्रसारण मंत्रालयातर्फे...
मुंबई / नगर सहयाद्री -
दादासाहेब फाळके ह्यांच्या जन्मशताब्दीवर्षापासून हे पुरस्कार दिले जाता असून याचे वितरण माहिती व प्रसारण मंत्रालयातर्फे केले जाते. दादासाहेब फाळके पुरस्कार भारत सरकारतर्फे दरवर्षी चित्रपटांमध्ये महत्वपुर्ण कामगिरी करणाऱ्या कलाकारांना आणि तंत्रज्ञांना दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार आहे. या सोहळ्यात अनेक कलाकारांना गौरविण्यात आले. आलिया-रणबीर या बॉलिवूडच्या लाडक्या जोडीलाही गौरविण्यात आले आहे.
भारतीय चित्रपट उद्योगातील प्रतिष्ठित व्यक्तींचा समावेश असलेल्या समितीद्वारे त्या चित्रपटांची, कलाकारांची आणि तंत्रज्ञानाची निवड केली जाते. मुंबईत दादासाहेब फाळके चित्रपट महोत्सव पार पडला आहे. या सोहळ्याला अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली आहे. या सोहळ्यात अनेक कलाकारांना गौरविण्यात आले. आलिया-रणबीर या बॉलिवूडच्या लाडक्या जोडीलाही गौरविण्यात आले आहे.
आलिया भट्टने सध्या चित्रपटातून ब्रेक घेतला आहे आणि मातृत्वाचा आनंद घेत आहे. नुकत्याच पार पडलेल्या प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळ्याला आलिया भट्ट उपस्थित राहिली होती. रणबीर त्याच्या कामामध्ये व्यस्त असल्याने त्याला या सोहळ्याला उपस्थित राहता आले नाही. तर पती-पत्नी दोघांनाही दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला आहे.
रणबीरला 2022 मध्ये रिलीज झालेल्या ब्लॉकबस्टर चित्रपट ब्रह्मास्त्रमधील त्याच्या उत्कृष्ट अभिनयासाठी या वर्षीचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त झाला आहे. तर गंगूबाई काठियावाडी या ब्लॉकबस्टर चित्रपटातील तिच्या दमदार अभिनयासाठी आलिया भट्टला यावर्षी दादासाहेब फाळके पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.
COMMENTS