मुंबई / नगर सहयाद्री - लाइव्ह शो नंतर कार्यक्रमातून निघत असताना गायक सोनू निगम याच्यासोबत धक्काबुक्की झाल्याची मोठी बातमी समोर आलीय. मुंबईती...
मुंबई / नगर सहयाद्री -
लाइव्ह शो नंतर कार्यक्रमातून निघत असताना गायक सोनू निगम याच्यासोबत धक्काबुक्की झाल्याची मोठी बातमी समोर आलीय. मुंबईतील चेंबूर भागात एका कार्यक्रमात गायक सोनू निगमला धक्काबुकी करण्यात आली आहे. या हल्ल्यानंतर गायक सोनू निगमला चेंबूर नाका येथील झेन हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार ,चेंबूरमधील एका कार्यक्रमात सोनू निगमसोबत धक्काबुक्की करण्यात आली. आमदाराच्या पोराकडून धक्काबुक्की झाल्याचा दावा समोर केला जात आहे. आमदार प्रकाश फातर्पेकर यांचे चिरंजीव स्वप्नील फातर्पेकर यांचा सोनू निगमच्या अंगरक्षकांशी सेल्फी घेण्यावरून वाद झाल्याची माहिती समोर आलीय.
सोनू निगमसोबत सेल्फी घेण्यासाठी गर्दी झाली होती चेंबूर फेस्टिवलमध्ये सोनू निगम गाणे गाण्यासाठी आला होता. यावेळी ठाकरे गटाचे आमदार प्रकाश फरतेपेकर यांचे कार्यकर्ते आणि सोनू निगमच्या अंगरक्षकांमध्ये वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. याचवेळी त्यांच्यात धक्काबुक्की झाली.
COMMENTS