नवी दिल्ली वृत्तसंस्था- आज मार्च महिन्याचा पहिला दिवस आहे आणि महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा मोठा धक्का बसला आहे.या निर्णयामुळे स्वयंप...
नवी दिल्ली वृत्तसंस्था-
आज मार्च महिन्याचा पहिला दिवस आहे आणि महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा मोठा धक्का बसला आहे.या निर्णयामुळे स्वयंपाक करण्यासाठी घरगुती तसेच रेस्टॉरंटमध्ये होणाऱ्या खर्चात वाढ होईल. म्हणजे घरी स्वयंपाक करून जेवणे आणि रेस्टॉरंटमध्ये जाऊन जेवणे हे दोन्ही आता महागले आहेत.बुधवारी सकाळपासून घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात ५० रुपयांनी वाढ झाल्याने शहरातील लाखो ग्राहकांवर खर्चाचा बोजा वाढला आहे.
वृत्तसंस्था माहितीनुसार, होळीपूर्वी सर्वसामान्यांना महागाईचा धक्का बसला आहे. महिन्याच्या पहिल्याच दिवशी घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत ५० रुपयांनी वाढ झाली असून मुंबईत एलपीजीचे दर १०५२.५० रुपयांवरुन थेट ११०२.५० रुपये प्रति सिलेंडरवर पोहोचले आहेत. दिल्लीत याची किंमत 1103 रुपयांवर गेली आहे. होळीपूर्वी सामान्य जनतेसाठी हा मोठा धक्का आहे. त्याच वेळी, 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत 350.50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. दिल्लीत 19 किलोचा व्यावसायिक सिलिंडर आता 2119.50 रुपयांना मिळेल.
एलपीजी सिलिंडरच्या नवीन किमती
दिल्लीत घरगुती एलपीजीची किंमत १०५३ रुपयांवरून ११०३ रुपये झाली
मुंबईत घरगुती एलपीजीची किंमत १०५२.५० रुपयांवरून ११०२.५० रुपये प्रति सिलेंडरवर पोहोचली आहे.
कोलकातामध्ये घरगुती एलपीजीची किंमत १०७९ रुपयांवरून ११२९ रुपयांपर्यंत वाढली आहे.
चेन्नईमध्ये घरगुती एलपीजीची किंमत १०६८.५० रुपयांवरून ११८.५० रुपयांपर्यंत वाढली आहे.
COMMENTS