नवी दिल्ली । नगर सह्याद्री - सिद्धू मूसेवाला प्रकरणात एक मोठे उपडेट समोर आले आहे. पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला हत्येप्रकरणातील 2 गुन्हेगार त...
नवी दिल्ली । नगर सह्याद्री -
सिद्धू मूसेवाला प्रकरणात एक मोठे उपडेट समोर आले आहे. पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला हत्येप्रकरणातील 2 गुन्हेगार तुरुंगात टोळीयुद्धात ठार झाले आहे. पंजाबमधील तरनतारन जिल्ह्यातील गोइंदवाल तुरुंगात रविवारी हिंसक चकमक झाली आहे. यात मनदीप सिंग तुफान आणि मनमोहन सिंग मोहना हे बदमाश मारले गेले आहे. आणखी एक केशवची प्रकृती चिंताजनक आहे. तिघांच्याही डोक्यावर धारदार शस्त्रांनी वार करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
तरनतारनचे आपत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. जगजीत सिंग यांनी सांगितले की, रविवारी दुपारी कारागृहातून आणलेल्या तीन जखमींपैकी दोघांचा रुग्णालयात आणण्यापूर्वीच मृत्यू झाला होता. तर तिसऱ्याची प्रकृती चिंताजनक आहे. गायक सिद्धू मूसेवालाच्या हत्येवेळी मारला गेलेला गुंड मनदीप तुफान स्टँडबाय शूटर म्हणून उपस्थित होता. तो जग्गू भगवानपुरिया टोळीचा सदस्य होता.
गुंड मनदीप सिंग तुफानची कारागृहातील कैद्यांशी काही कारणावरून भांडण झाले होते. यानंतर कैद्यांनी त्याला बेदम मारहाण केली आहे. या हाणामारीत अन्य तीन ते चार कैदीही जखमी झाल्याची माहिती आहे.
सिद्धू मूसेवाला खून प्रकरणाच्या दिवशी मनदीप तुफानही घटनास्थळी उपस्थित होता. गोल्डी ब्रारने मणी रैयाला जग्गू भगवानपुरियाच्या खास मनदीप तुफानशिवाय स्टँडबायवर ठेवले होते. त्याला जगरूप उर्फ रूपा आणि मनप्रीत मन्नू यांना कव्हर करण्यास सांगितले होते. जग्गू भगवानपुरिया यांच्याकडे चौकशी केल्यानंतर मनदीप तुफानचे नाव समोर आले आहे.
COMMENTS