मुंबई | नगर सह्याद्री- दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊनमधून हरमनप्रीत कौर आणि पूजा वस्त्राकर सेमीफायनल मॅचमध्ये खेळणार नाहीत अशी माहिती सूत्रांकडू...
मुंबई | नगर सह्याद्री-
दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊनमधून हरमनप्रीत कौर आणि पूजा वस्त्राकर सेमीफायनल मॅचमध्ये खेळणार नाहीत अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे त्यामुळे महिला वर्ल्ड कपच्या सेमीफायनल मॅचआधीच भारताला मोठा झटका बसला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार या दोन्ही खेळाडूंचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध मॅचमध्ये खेळण्याबद्दल साशंकता कायम आहे.मॅचआधी भारतीय टीमने केलेल्या जोरदार सरावात या दोन्ही खेळाडू टीमसोबत दिसल्या नाहीत.
हरमनप्रीत कौरची कामगिरी चांगली नसली तरी तिच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 4 पैकी 3 सामने जिंकले आहेत. हरमनप्रीतकडे नॉकआऊट सामन्यांमध्ये खेळण्याचा मोठा अनुभव आहे, अशा परिस्थितीत ती खेळली नाही, तर सेमीफायनलमध्ये भारताच्या अडचणी वाढू शकतात.
पूजा वस्त्राकर सुद्धा महत्त्वाची गोलंदाज आहे. वर्ल्ड कपच्या 4 सामन्यात 2 विकेट घेतल्या आहेत.ती संघासाठी महत्वाची आहे.
COMMENTS