वाशिम / नगर सहयाद्री- वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील बोराळा येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. गावातीलच उपसरपंचाची काही जणांनी हत्या के...
वाशिम / नगर सहयाद्री-
वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील बोराळा येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. गावातीलच उपसरपंचाची काही जणांनी हत्या केल्या बातमी समोर आली आहे. राजकीय वादातून ही हत्या झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
प्राप्त माहितीनुसार, मालेगाव तालुक्यातील बोरोळा गावात नुकतीच ग्रामपंचायतीचे निवडणुक झाली. गावकऱ्याचा विश्वास संपादन करात विश्वास कांबळे (वय ६० वर्ष) भरघोस मतं मिळवून त्याच्या पॅनलसह भरघोहेस मतांनी निवडून आले होते. त्यानंतर उपसरपंचपदी विराजमान होत गावचा कारभार हाती घेतला. विश्वास हे अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे अन सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होणारे व्यक्तिमत्त्व होते.त्यानंतर विरोधी पक्षातील लोक त्यांच्यावर राग धरून होते.
विश्वास कांबळे आपल्या पत्नीसह ( शनिवारी दि. १८ ) रोजी किन्हीराजा येथे दवाखान्याय गेले होते. यावेळी कांबळे दवाखान्याच्या बाजुला लघवीसाठी गेले असता दुपारच्या सुमारास त्याच्या पत्नीला आरडा-ओरडा झाल्याचा आवाज आला. पुढे गेल्या तीन-चार इसम आपल्या पतीला असता एका पांढऱ्या रंगाच्या चार चाकी गाडी मध्ये तीन-चार इसम जबरदस्ती करत आतमध्ये उचलून टाकत होते.
आरडा-ओरडा गोधंळ पाहता त्यावेळी तिथे बाजुला असलेली तरुण मुले गोधंळ पाहून पळत गेले असता त्या गाडी मध्ये विश्वास कांबळे यांना घेऊन पसार झाले. दरम्यान त्या इसमां नकडून एक मोबाईल व काही कागद खाली पडले. त्यानंतर ते बेशुद्ध अवस्थेत मालेगाव तालुक्यातीलच गुंज या ठिकाणी आढळून आले होते. नंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं तेव्हा त्यांना मयत घोषित करण्यात आले होते.
त्यांच्या पत्नीच्या महीतीनुसार, निवडणुकीत पराभव झाल्याचा राग मनात धरून आरोपी हे विश्वास कांबळे यांच्यावर नेहमी पाळत ठेऊन असत. त्यातूनच त्यांनी अपहरण करून त्यांची हत्या केली आहे. पोलिसांनी या प्रकरणात ॲट्रॉसिटीसह, अपहरण आणि खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. गावातीलच चार आरोपीना पोलिसांनी अटक केली आहे. अन्य आरोपीचा शोध सुरु आहे.
COMMENTS