मुंबई । वृत्तसंस्था- प्रेमासाठी काही लोक वाटेल ते करतात. अनेकदा त्यांच्या प्रेमाचे भन्नाट किस्से हे समोर येत असतात. काही वेळा एकाच तरुणीवर...
मुंबई । वृत्तसंस्था-
प्रेमासाठी काही लोक वाटेल ते करतात. अनेकदा त्यांच्या प्रेमाचे भन्नाट किस्से हे समोर येत असतात. काही वेळा एकाच तरुणीवर किंवा मग एकाच तरुणावर खूप जणांचा जीव जडतो. मग अशावेळी त्या व्यक्तीला मिळवण्यासाठी नानाविध उपाय केले जातात.
असाच दोन तरुणींच्या भांडणाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दोन तरुणी भांडता एकमेकांच्या जीवावर उठल्याचं पाहायला मिळतं. तसेच त्यांनी एकमेकींचे केसही ओढले. तळीरश्र_घळवर ट्विटर अकाउंटवर एक हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्ही थक्क व्हाल.
एका बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींमध्ये तुफान राडा झाल्याची घटना यवतमाळच्या वणीतील शिवाजी पार्क लव्हर्स पॉईंट येथील आहे. बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींची तुफान हाणामारी झाली. व्हायरल व्हिडीओमधील तरुणी कॉलेजमधील असल्याचं दिसून येत आहे. या तरुणींनी एकमेकींना केस उपटून आणि लाथाबुक्क्यांनी हाणामारी केली आहे.
तरुणींनी एकमेकींना शिवीगाळ केली आहे.एकाच तरुणाचं दोन तरुणींसोबत रिलेशनशिप सुरु होतं. मात्र अचानक दोन्ही मुली आमनेसामने आल्या आणि सत्य समोर आलं आणि मग काय याच कारणावरुन दोन्ही तरुणींमध्ये वाद सुरु झाला त्यानंतर हा वाद इतका वाढला की या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. या हाणामारीचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
COMMENTS