कारेगावात विविध विकास कामांचा शुभारंभ पारनेर | नगर सह्याद्री राजकारणाचा नैतिक स्तर सध्या खुप खालवत चाललेला असुन निवडणूक आयोगाने ज्यांनी श...
कारेगावात विविध विकास कामांचा शुभारंभ
पारनेर | नगर सह्याद्रीराजकारणाचा नैतिक स्तर सध्या खुप खालवत चाललेला असुन निवडणूक आयोगाने ज्यांनी शिवसेना पक्ष स्थापन केला त्यांना पक्ष व चिन्ह राहिले नाही तर पक्षातून बाहेर गेलेल्यांनी पक्ष ताब्यात घेतला आहे. त्यामुळे या बदलत्या राजकीय घडामोडी पासून समाजात राग उत्पन्न झालेला आहे. जे चाललंय ते राजकीय दृष्ट्या चांगलं नाही, अशी खंतही जिल्हा परिषदेचे माजी सभापती काशिनाथ दाते यांनी व्यक्त केली आहे.
डोंगरी विकास अंतर्गत कारेगाव येथील स्मशानभूमी कडे जाणारा रस्ता करणे - १० लक्ष कामाचे भूमिपूजन जिल्हा परिषदेचे बांधकाम कृषी समिती सभापती काशिनाथ दाते यांचे शुभहस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना जिल्हा उपप्रमुख रामदास भोसले होते तर तालुकाप्रमुख डॉ. श्रीकांत पठारे उपतालुका प्रमुख सुनिताताई मुळे यांची प्रमुख उपस्थित होते. यावेळी सरपंच बापूराव ठुबे, उपसरपंच अनिता पंडित, ग्राम. सदस्य गंगाराम घुले, दत्ता घुले, सुभाष खरात, ज्ञानेश्वर घुले, शाखाप्रमुख शरद जगदाळे, सविता राजदेव, सावकार मुळे, बाळासाहेब घुले, विष्णू घुले, विनायक घुले, देवस्थान अध्यक्ष काशिनाथ घुले, अजित घुले, भास्कर खरात, अशोक खरात, साहेबराव खरात, अशोक पंडित, संजाबाई घुले, पूनम घुले अरुणा गुंजाळ, तुकाराम ठुबे, महेश गुंजाळ, रामदास घुले, योगेश घुले, संदीप घुले, राजू गुंजाळ, संपत ठुबे, तान्हाजी मुळे, लक्ष्मण घुले, ठकाभाऊ घुले, रवींद्र गुंजाळ, दादाभाऊ घुले, बाबाजी खरात, अनिल घुले, पोपट ठुबे, गणपत मुळे, बाळशिराम घुले, बाजीराव घुले, सखाराम खरात, संदीप घुले, शिवाजी गुंजाळ, विष्णू खरात, प्रवीण घुले, ग्रामसेवक हरिष भालेराव इत्यादी मान्यवर उपस्थितीत होते.
यावेळी सभापती काशिनाथ दाते म्हणाले, जिल्हा परिषद मध्ये काम करत असताना मी कौशल्य वापरून डोंगरी विकास अंतर्गत असलेला ४५ लक्ष रुपयांचा निधी जिल्हाधिकारी यांच्याकडून मिळविला. पाडळी दर्या येथील काळेवाडी रस्त्यावर मोरी बांधकाम व खडीकरण करणे साठी २५ लक्ष रुपये, कारेगाव स्मशान भूमी कडे जाणार्या रस्त्याला १० लक्ष आणि नांदूर पठार येथील रस्त्यासाठी १० लक्ष असा निधी मिळवला. कारेगाव लहान परंतु माणसे सर्व मोठे मनाची आहे. सर्व विकास कामासाठी एकत्र असतात. म्हणून गाव लहान असले तरी माजी आमदार विजय औटी त्यांच्याकडून तुम्ही कौशल्याने एवढा मोठा निधी मिळवला. त्यांनी एक कोटी रुपयांचा पाझर तलाव बंधारा केलेला आहे. गावात सोशल सेंटरच्या माध्यमातून, बचत गटाच्या महिलांच्या माध्यमातून फार मोठे काम झाले आहे. एखादे काम आपण जर कल्पनेने केले तर लोक त्याची प्रेरणा कशी घेतात याची ज्वलंत उदाहरण म्हणजे जवळा गाव. या ठिकाणी गावांतर्गत चौक रस्ता करणे करता मी २० लक्ष रुपयांचा निधी दिला. त्यांनी तो रस्ता तो दुतर्फा करून चौक सुशोभीकरण केला आणि या चौकात ५१ फुट उंचीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा शिवजयंती निमित्त त्याचे अनावरण करून बसवला. मला संधी खूप उशिरा मिळाली ४२ वर्ष मी समाजकारणात आहे. त्यामुळे काम करणारे कोण आहेत हे आता लोकांच्या लक्षात येईल. आज राजकारणाचा नैतिक स्तर खूप खालवत चाललेला आहे. परंतु असू द्या हे गाव खूप चांगलं आहे. येथून मला भरभरून मतदान झाले आहे. उद्याच्या काळात तुम्ही जे काम सांगाल त्यामध्ये कसलीही टाळाटाळ केली जाणार नाही. कामाची काळजी करू नका, आपण आम्हाला बोलावले मानसन्मान केला कार्यक्रम खूप चांगला केला तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो. यावेळी तालुकाप्रमुख डॉ. श्रीकांत पठारे, महिला उप तालुका प्रमुख सुनिता मुळे, सरपंच बापुराव ठुबे, ग्राम. सदस्य गंगाराम घुले, माजी सरपंच साहेबराव खरात यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक काशिनाथ घुले यांनी केले. सूत्रसंचालन दत्ता घुले यांनी तर आभार सखाराम ठुबे सर यांनी मानले.
संधी उशिरा मिळाली : सभापती दाते
१९८० सालापासून समाजकारण राजकारण सार्वजनिक जीवनाला सुरुवात केली. मी सातत्याने समाजात आहे. लोकांच्या सुख दुःखात आहे. ४२ वर्ष मी समाजकारणात राजकारणात असूनही मला संधी उशिरा मिळाली, अशी खंत काशिनाथ दाते यांनी व्यक्त केली आहे.
COMMENTS