अहमदनगर । नगर सह्याद्री- शिवजयंतीदिनी महापालिकेत पार पडलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चौथर्याच्या भूमिपूजन सोहळ्यास गैरहजर...
अहमदनगर । नगर सह्याद्री-
शिवजयंतीदिनी महापालिकेत पार पडलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चौथर्याच्या भूमिपूजन सोहळ्यास गैरहजर राहणार्या कर्मचार्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. उपस्थितीचा आदेश बजावूनही काही अधिकारी व बहुतांश कर्मचारी गैरहजर राहिले होते. त्याची गंभीर दखल घेत आयुक्त पंकज जावळे यांनी विभाग प्रमुखांकडून अहवाल मागविले आहेत. उपायुक्त श्रीनिवास कुरे यांनी विभाग प्रमुखांना याबाबत नोटिसा दिल्या आहेत.
छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते भूमिपूजनाचा सोहळा पार पडला. अनेक अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी आपल्या अधिनिस्त कर्मचार्यांसह उपस्थित राहून विभागातील उपस्थित कर्मचार्यांच्या उपस्थितीचे हजेरी पत्रक सामान्य प्रशासन विभागात देण्याबाबत विभाग प्रमुखांना आदेश देण्यात आले होते.
मात्र, बहुतांश विभागातील अनेक कर्मचारी कार्यक्रमास गैरहजर असल्याने पदाधिकारी व आयुक्तांनी नाराजी व्यक्त केल्याचे उपायुक्तांनी म्हटले आहे. त्यामुळे विभाग प्रमुखांनी विभागातील गैरहजर कर्मचार्यांचा खुलासा व विभागातील कर्मचारी का गैरहजर होते, याबाबतचा अहवाल तीन दिवसात सादर करावा, अन्यथा याबाबत विभाग प्रमुखांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात येईल, असा इशारा नोटीसीत देण्यात आला आहे.
COMMENTS