अहमदनगर | नगर सह्याद्री- तालुक्यातील खांडके येथील कामगार तलाठी रामेश्वर भागवत गोरे यांच्याविरुध्द जमिनीच्या नोंदी प्रकरणी ५ हजार रुपयांची ला...
अहमदनगर | नगर सह्याद्री-
तालुक्यातील खांडके येथील कामगार तलाठी रामेश्वर भागवत गोरे यांच्याविरुध्द जमिनीच्या नोंदी प्रकरणी ५ हजार रुपयांची लाच घेतल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.या प्रकरणातील तक्रारदाराने २० फेब्रुवारी रोजी ४८ गुंठे जमिन विकली होती व खरेदीदारास त्याची नोंद करुन देण्याची जबाबदारीही स्वत: घेतली होती. त्यांनी तलाठी गोरे यांना दस्त व सुची २ देवुन खरेदी घेणार्या व्यक्तीच्या नावाची नोंद शासकीय अभिलेखात करण्यास सांगुन फेरफार देण्यास सांगितले होते. त्यावेळी आरोपी लोकसेवक गोरे याने तक्रारदाराकडे ५ हजार रुपयांची मागणी केली.
तक्रारदारांनी ही माहिती, त्वरीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला याची माहिती दिली. या अनुषंगाने लाच मागणी पडताळणी केली असता पंचासमक्ष लाच मागणी होत असल्याचे दिसले.सुरभी हॉस्पीटल चौकात सापळा लावण्यात आला. यावेळी तक्रारदारांनी फोन पे व्दारे आरोपीच्या बॅक खात्यावर ५ हजार रुपये पाठविले. त्यावेळी आरोपी गोरे याने पैसे मिळाल्याची खात्री करुन घेवुन तेथुन निघुन गेला.
पोलीसांनीही ५ हजार रुपये त्याच्या खात्यावर वर्ग झाल्याची खात्री केली व आरोपीचा शोध घेवुन त्याला ताब्यात घेतले. पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक नारायण न्हाळदे, पोलीस उपअधिक्षक हरीष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शरद गोर्डे ,संताष शिंदे, पोलीस अंमलदार रविंद्र निमसे, वैभव पांढरे, सचिन सुद्रुक, हरुन शेख यांनी यशस्वीरित्या सापळा लावला.
COMMENTS