श्रीगोंदा | नगर सह्याद्री श्रीगोंदा शहरातील सोनिया गांधी पॉलिटेनिक कॉलेजमध्ये शिकत असलेली वैष्णवी दत्तात्रय कळमकर वय वर्षे १७ या विद्यार्थ्य...
श्रीगोंदा शहरातील सोनिया गांधी पॉलिटेनिक कॉलेजमध्ये शिकत असलेली वैष्णवी दत्तात्रय कळमकर वय वर्षे १७ या विद्यार्थ्यांनीने दि. २२ फेब्रुवारी रोजी दुपारी दोन ते तीनच्या सुमारास राहत असलेल्या वसतिगृहाच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. श्रीगोंदा शहरातील सोनिया गांधी पॉलिटेनिक या कॉलेजमध्ये शिकत असलेली . वैष्णवी दत्तात्रय कळमकर वय वर्षे १७ रा. कामठी (ता. श्रीगोंदा) ही विद्यार्थिनी इंजिनिअरिंगच्या पाहिल्या वर्षात शिकत होती. सोनिया गांधी पॉलिटेनिक कॉलेजने कॉलेजच्या पाठीमागील बाजूस रोहाउसचे कॉम्प्लेस भाडे तत्त्वावर घेतलेले आहे. या कॉम्प्लेस मध्ये मुलींसाठी खाजगी वस्तीगृह सुरू केलेले आहे. कॉलेजच्या वेळेत रूममधील सर्व मुली कॉलेजमध्ये गेल्या होत्या. वैष्णवी कळमकर ही एकटीच रूममध्ये होती. तिने रूमचा दरवाजा आतून बंद केला. आणि दोरीच्या सहाय्याने फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली. कॉलेजचे प्राचार्य अमोल नागवडे यांनी पोलीस स्टेशनला खबर देताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. व प्रेताची पाहणी करून पंचनामा केला. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश जानकर हे करीत आहेत.
COMMENTS