मुंबई नगर सहयाद्री - पहाटेच्या शपथविधी प्रकरणी अजित पवारांनी बोलण्याची काय गरज आहे?, तो केवळ सरकार बदलायचा प्रयत्न झाला. पहाटेच्या शपथविधीमु...
मुंबई नगर सहयाद्री -
पहाटेच्या शपथविधी प्रकरणी अजित पवारांनी बोलण्याची काय गरज आहे?, तो केवळ सरकार बदलायचा प्रयत्न झाला. पहाटेच्या शपथविधीमुळेच राष्ट्रपती राजवट उठली, असे सांगत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी या शपथविधीची माहिती असल्याचे अप्रत्यक्ष मान्य केले. पहाटेच्या शपथविधीबाबत सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या गौप्यस्फोटानंतर अजित पवार यांना याबाबत वारंवार विचारणा करण्यात आली, मात्र त्यानी त्यावर मौन बाळगले. पवार यांनीही याबाबत काहीच बोलणार नसल्याचे यापूर्वी सांगितले होते. मात्र आता त्यांनी याबाबत वक्तव्य केले आहे.
ते म्हणाले, राष्ट्रपती राजवट उठली म्हणूनच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीवर बोलण्याची काय गरज आहे? समजने वाले को इशारा काफी है. पहाटेचा शपथविधी ही राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठीची खेळी होती, त्यामुळेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले असेही त्यांनी स्पष्ट केले.एक प्रकारे शरद पवारांनी पहाटेच्या शपथविधीबद्दल माहिती असल्याचे कबूल केले आहे. यानंतर आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे.
याआधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व शरद पवारांना माहिती आहे असे वक्तव्य केले होते.हेल्पलाईनला फोन लावला असेही त्यांनी स्पष्ट केले.एक प्रकारे शरद पवारांनी पहाटेच्या शपथविधीबद्दल माहिती असल्याचे कबूल केले आहे. यानंतर आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे. याआधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व शरद पवारांना ंमाहिती आहे असे वक्तव्य केले होते.
COMMENTS