मुंबई । नगर सह्याद्री - ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या पत्रानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. जीवे मारण्याच्या धमकीनंतर खासदार स...
मुंबई । नगर सह्याद्री -
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या पत्रानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. जीवे मारण्याच्या धमकीनंतर खासदार संजय राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. संजय राऊत यांना नाशिक पोलिसांनी सुरक्षा दिली आहे.
संजय राऊतांच्या जीवे मारण्याच्या धमकीनंतर त्यांनी थेट मुंबई पोलीस आयुक्त आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले होते. त्यांनी पत्रात श्रीकांत शिंदेनी माझ्यावर हल्ला करण्यासाठी ठाण्यातील गुंड राज ठाकूरला सुपारी दिली असा आरोप केला होता.
संजय राऊत नाशिकच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यादरम्यान संजय राऊत यांच्या पोलीस सुरक्षेत वाढ केली आहे. नाशिक पोलिसांनी संजय राऊत यांना पोलीस सुरक्षा दिली आहे. संजय राऊत यांच्या पत्रानंतर गृहविभागाकडून दखल घेतल्याचे पाहायला मिळत आहे.
काल पासून संजय राऊत हे नाशिकमध्ये आले आहे. तर आज राऊत हे सिन्नरकडे जाणार आहे. संजय राऊत यांना धमकी मिळाल्यानंतर ठाणे पोलिसांचे एक पथक नाशिकमध्ये दाखल झाले आहे. ठाणे पोलिसांनी संजय राऊत यांचा जवाब घेण्याचे काम सुरू आहे.
ठाणे एसीपी हे संजय राऊत यांचा जवाब घेत आहे. काल त्यांनी जीवे मारण्याची सुपारी दिल्याचा आरोप केला होता. राऊतांच्या आरोपानंतर ठाणे पोलिसांकडून राऊत यांचा जवाब घेण्याचे काम सुरू आहे. ठाणे पोलिसांच्या ६ जणांचे पथक नाशिकच्या 'एक्स्प्रेस इन' हॉटेलमध्ये दाखल झाले आहे.
COMMENTS