नेवासा । नगर सह्याद्री निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह ठाकरे गटाकडून दुसर्या गटाला दिले आहे. हे चिन्ह दुसर्या गटाला मिळणं हा अनाकलनीय...
नेवासा । नगर सह्याद्री
निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह ठाकरे गटाकडून दुसर्या गटाला दिले आहे. हे चिन्ह दुसर्या गटाला मिळणं हा अनाकलनीय व दुर्दैवी निर्णय असून मी कायम उध्दव ठाकरेंबरोबरच रहाणार असून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याची स्पष्ट भूमिका माजी जलसंधारण मंत्री, आमदार शंकरराव गडाख यांनी घेतली आहे.
धनुष्यबाण चिन्हा बाबत निवडणूक आयोगाने घेतलेली भूमिका याबाबत माजी मंत्री शंकरराव गडाख हे नेवासा येथे आले असता त्यांनी माध्यमांशी बोलतांना प्रतिक्रिया दिली. आमदार शंकरराव गडाख म्हणाले की निवडणूक आयोगाने ठाकरे गटाकडून काढून दुसर्या गटाला धनुष्यबाण हे चिन्ह दिले. त्यामुळे शिवसेना व कार्यकर्ते खचून जातील अशी कोणतीच परिस्थिती नाही.
उलट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार गावागावात व घराघरात नेण्यासाठी शिवसैनिक हे पेटून उठतील. रक्ताचं पाणी करून काम करतील यासाठी उध्दवसाहेब ठाकरे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. ते जशी वाटचाल करतील त्यांच्याबरोबर मी भक्कमपणे पाठिशी उभा राहून त्यांना देण्याचे काम करणार असल्याची स्पष्ट भूमिका आपण घेतली असल्याचे आमदार शंकरराव गडाख यांनी यावेळी बोलताना सांगितले.
COMMENTS