बुलढाणा /नगर सह्याद्री- पोलीस ठाण्यात बलात्कार झाल्याची फिर्याद देऊन नंतर कोर्टात साक्ष फिरविणाऱ्या महिलेला न्यायालयाने दोन महिने कैदेची शिक...
बुलढाणा /नगर सह्याद्री-
पोलीस ठाण्यात बलात्कार झाल्याची फिर्याद देऊन नंतर कोर्टात साक्ष फिरविणाऱ्या महिलेला न्यायालयाने दोन महिने कैदेची शिक्षा सुनावली आहे.
चिखली तालुक्यातील अमडापूर पोलीस स्टेशनला एका २७ वर्षीय महिलेने तिच्या पतीच्या मित्राने तिच्यावर बलात्कार केल्याची तक्रार दाखल केली होती.पोलिसांनी तत्परतेने कारवाई करून दोषारोप पत्र दाखल केले.
मात्र फिर्यादी महिलेने न्यायालयामध्ये साक्ष देताना तिच्यासोबत आरोपीने कोणतेही कृत्य केले नाही, अशी साक्ष दिली.न्यायालयाने आरोपीला पुराव्या अभावी निर्दोष मुक्त तर केले मात्र फिर्यादी महिलेने जाणून बुजून न्यायालयात खोटी साक्ष दिल्याची बाबही समोर आणली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. एन. मेहेरे यांनी स्वतः ई- फायलींच्या माध्यमातून हे प्रकरण दाखल केले.फिर्यादी महिलेला बाजू मांडण्याची संधी सुद्धा देण्यात आली होती. मात्र महिलेने आपले म्हणणे मांडले नाही त्यामुळे न्यायालयाने या महिलेला खोटी साक्ष दिल्याबाबत दोषी धरले व दोन महिन्याच्या साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. ई - फायलिंगद्वारे दाखल केलेल असं हे पहिलंच प्रकरण आहे.
COMMENTS