निघोज । नगर सह्याद्री माजी खासदार बाळासाहेब विखे पाटील यांच्या विचारांशी प्रतारणा करणार्यांनी सावध भूमिका घेण्याची गरज असून या कार्यक्रमा...
निघोज । नगर सह्याद्री
माजी खासदार बाळासाहेब विखे पाटील यांच्या विचारांशी प्रतारणा करणार्यांनी सावध भूमिका घेण्याची गरज असून या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज शिवसेना - भाजप युतीच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला, असे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.
पारनेर तालुक्यातील आळकुटी येथील एक कोटी 54 लाख रुपयांच्या नळ पाणीपुरवठा योजनेचे भूमिपुजन खासदार डॉ. विखे पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी आळकुटी सरपंच डॉ. कोमल भंडारी, उपसरपंच अरिफ पटेल, माजी उपसरपंच शरद घोलप, बाळासाहेब धोत्रे, लताबाई घोलप, सचिन साखला, राहुल शिंदे, संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील वराळ, भाजपचे तालुकाध्यक्ष वसंत चेडे, विश्वनाथ कोरडे, शिवसेना तालुकाप्रमुख विकास उर्फ बंडू रोहोकले, पंचायत समिती सदस्य दिनेश बाबर, शैलेंद्र औटी, डॉ. भाऊसाहेब खिलारी, राळेगण थेरपाळ सरपंच पंकज कारखीले, रांधे येथील सरपंच बाळासाहेब आवारी, भाऊसाहेब डेरे, नीलेश घोडे, प्रतिक वरखडे, अस्लमभाई इनामदार आदी उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वयोश्री योजनेंतर्गत दीड हजार वृद्धांना साहित्य देण्यात आले.
खा. विखे पाटील म्हणाले, पंतप्रधान मोदी यांनी गेल्या चार वर्षात विविध योजनेच्या माध्यमातून गोरगरीबांना साहित्य, धान्य वाटप व लोकोपयोगी योजना दिल्या आहेत. पंतप्रधान मोदी यांनी जगात भारताला नावलौकिक मिळवून दिला. देशात विकास योजना राबवून देश संपन्न केला. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना तुमच्या आशिर्वादाने मंत्रिमंडळात सर्वोच्च स्थान मिळाले. यापुढील सहा महिन्यांत प्रत्येकाला शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी मेळावे घेण्याचे काम आम्ही करणार आहोत. माजी खा. बाळासाहेब विखे पाटील यांनी गेली अनेक वर्षात गरीब समाजाला आधार देत विकासाच्या योजना राबविल्या. मात्र जे त्यावेळी बरोबर होते ते आज विरोधी पक्षात आहेत. त्यांनी विखे पाटील यांच्या विचाराशी प्रतारणा केली. अशांनी सावध राहत पुन्हा आमच्या बरोबर आले तर त्यांचे स्वागतच आहे. यासाठी मी त्यांच्याकडे जाणार नाही. स्थानिक कार्यकर्ते यांनी त्यांना आपली भूमिका सांगण्याची गरज आहे.
संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील वराळ यांनी गेली पाच वर्षात जिल्हा परिषद, पंचायत समिती माध्यमातून केलेल्या कामांची माहिती दिली. या सहा महिन्यांत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून जवळपास 60 कोटी रुपयांची कामे मंजूर झाल्याचे ते म्हणाले.
-
COMMENTS