नवी दिल्ली । नगर सह्याद्री- महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या बहुचर्चित खटल्याची सुनावणी आता 28 फेब्रुवारीपासून होणार आहे. सरन्यायाधीश धनंजय ...
नवी दिल्ली । नगर सह्याद्री-
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या बहुचर्चित खटल्याची सुनावणी आता 28 फेब्रुवारीपासून होणार आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बहुमत चाचणीपूर्वी राजीनामा का दिला, हा कळीचा प्रश्न उपस्थित केला.
ठाकरे गटाचे अॅड. कपिल सिब्बल यांनी सलग तीन दिवस युक्तिवाद केला. बुधवारी त्यांनी तत्कालीन राज्यपालांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांचे सहकारी अॅड. अभिषेक मनू सिंघवी यांनीही व्हीपचे उल्लंघन करणार्या शिंदे गटाच्या 39 आमदारांना अपात्र घोषित करा, अशी मागणी केली. मात्र त्यावर
जर बहुमत चाचणीत शिंदेंच्या 39 आमदारांनी विरोधात मतदान केले असते व त्यामुळे ठाकरे सरकार पडले असते तर आम्ही त्या आमदारांना अपात्र ठरवू शकलो असतो. बहुमत चाचणीही रद्द केली असती; पण ठाकरेंच्या राजीनाम्यामुळे आमदारांवर मतदानाची वेळच आली नाही. तुम्ही (ठाकरेंनी) हा अधिकार गमावला, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. दरम्यान, पुढील सुनावणी 28 फेब्रुवारीपासून होईल. त्या वेळी शिंदे गटाला युक्तिवादाची संधी मिळेल.
COMMENTS